वायरल मिम्स आणि उन्हाळा

संपादकीय 

नागपूर, दि. २६/०५/२०२३

दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे,त्याचा फटका हि संपूर्ण जगाला बसत आहे , निसर्गाचे संतुलन राहावे यासाठी विविध देश आणि त्यातील सरकार हे नवनवीन योजना आणीत असतात , त्याच अनुषंगाने  महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी 2014 ते 2019 या कालावधीत 2 हजार 429 कोटी रुपये खर्च करण्यात आले . फडणवीस सरकारच्या काळात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन मंत्रालयाची धुरा होती.  यात श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी झाली.   (Sudhir Mungantiwar on Tree plantation scam).

33 कोटी वृक्ष लागवड हे ईश्वरीय पर्यावरण कार्य आहे. याच मिशनमुळे राज्यातील वनेत्तर क्षेत्रात जंगल वाढल्याची केंद्रीय वनसर्वेक्षण विभागाने नोंद केली. ही वृक्ष लागवड वनविभागाने नव्हे, तर 32 विभागांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून केली आहे.”असेही श्री.मुनगंटीवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

या जुन्या घडलेल्या कार्याला काही लोक विसरून पण गेले असतील पण आजही उन्हाळा आला कि मात्र लोक मुद्धामच त्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची मिम्स (Memes) शेयर करून आनंद घेण्याचा प्रयत्न करीत असतात , इंटरनेटवर कुणीतरी Being Marathi या नावाने १ मिम्स बनवून वायरल  केले आहे त्यात  “सुधीर मुनगंटीवार यांनी लावलेले ३३ कोटी झाड आज वाढली असती तर उन्हाचा त्रास जाणवला नसता” असा मजकूर लिहून आहे.

या मिम्स चा प्रभाव कितपत पडला  हे जरी स्पष्ट नसले तरी लोकांचे मनोरंजन मात्र नक्की होत आहे.

जेवढी  प्रखरता फक्त उकाड्यात झाडांची आठवण करणे, गाडी लावायला झाड शोधणे ,आणि त्यावर मिम्स बनवून आनंद घेणे सोडले तर तेवढी प्रखरता मात्र झाड लावण्यात आणि ते जागविण्यात दिसून येत नाही हे मात्र खरे.

झाडे लावा – झाडे जगवा