श्री.विलास ढोरे , वडसा तालुका प्रतिनिधी,न्युज जागर
देसाईगंज, दि.२९/०५/२०२३
स्व रामचंद्र जेठानी मेमोरियल ट्रस्ट, देसाईगंज द्वारा संचालित यशोदादेवी इंग्लिश मीडियम हाईस्कूल अँड जूनियर कॉलेज ने याही वर्षी आपल्या 12 वी च्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के निकाल दिला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर सहा विद्यार्थी प्रथम श्रेणीत ही परीक्षा उत्तीर्णझाले आहेत. यात कु. शतायु प्रकाश नाकडे ही विद्यार्थिनी ८४.५०% गुण घेऊन कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आली आहे तर कू. पूर्वाn यशवंतराव पिल्लारे ही विद्यार्थिनी ७७% गुण घेऊन द्वितीय, कु प्रतीक्षा नरेश पंचभाई ६५.१७% गुण घेऊन तृतीय, कु. रोहिणी ओमप्रकाश बंसोड व यशस्वी उमेश मेश्राम या विद्यार्थिनी ६४.६७% गुण घेऊन चौथ्या तर कू. पल्लवी चेतन मुळे ६२.१७% गुण घेऊन पाचवीआली.
सगळ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष मोतीलाल जेठानी, उपाध्यक्ष सुरेश ठकरानी, सचिव राजेश जेठानी, विनोद जक्कनवार सर, रासेकर सर, नानक परसवानी, श्रीमती मानवी जेठानी, प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.