चामोर्शी वकील संघातर्फे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे ना बडतर्फ करण्याची मागणी

chamorshi-vakil-sangh-demand-for-suspend-to-pi-rajesh-khandve
chamorshi-vakil-sangh-demand-for-suspend-to-pi-rajesh-khandve

श्री.अमित साखरे ,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

चामोर्शी,दि.२९/०५/२०२३

देशात लोकशाहीची जोपासना करण्यासाठी भारतीय संविधानाने न्यायव्यवस्था निर्माण केलेली असून त्या अनुषंगाने न्यायव्यवस्था कामकाज करीत असते. चामोर्शी न्यायालयात दाखल झालेला फौ.मा. क्र.31/2023 अतुल गण्यारपवार विरुद्ध राजेश खांडवे या मामल्यात विद्यमान न्यायालयानी दी.२०/०५/२०२३ रोजी आरोपी राजेश खांडवे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करून तपास करण्याचे निर्देश पोलीस स्टेशन चामोर्शी यांना दिलेले होते. परंतु सदर मामल्यातील आरोपी हा पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची तसेच न्यायालयाचे आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी असताना सुद्धा आरोपी राजेश खांडवे यांनी दिनांक २५/०५/२०२३ रोजी सकाळच्या सुमारास थेट न्यायाधीशाच्या बंगल्यावर जाऊन न्यायाधीशांशी हुज्जत घालून शिवीगाळ करून धमकी दिली. NewsJagar 

सदर घटना ही अत्यंत निंदनीय असल्यामुळे तालुका वकील संघ चामोर्शी यांनी आरोपी राजेश खांडवे चा तीव्र निषेध करीत असून पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष एडवोकेट डी.जी उंदीरवाडे, ॲड. के. टी. सातपुते, ॲड. ए. एम.तुरे, ॲड. एम. डी. तुरे, ॲड. एम.डी.सहारे, ॲड. व्ही. जि. चीळगे, ॲड.संजय भट्ट, ॲड.डी.एन.राऊत, ॲड.टी.जी.भररे उपस्थित होते. जर कायदा व सुव्यवस्थेचा रक्षण करणाराच न्यायाधीशांशी उज्जत घालून शिवीगाळ करून धमकी देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होईल ?  असा प्रश्न वकील संघ चामोर्शी यांच्या समोर निर्माण झालेला आहे. chamorshi-vakil-sangh-demand-for-suspend-to-pi-rajesh-khandve