श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्युज जागर
सावरगाव, दि.०१/०६/२०२३
नागभीड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उश्रlळ मेंढा येथे पाच टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत प्रति लाभार्थीना तीन हजार रुपयांचा धनादेश लोकनियुक्त सरपंच हेमराज लांजेवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. प्रेमदास श्रावण खोब्रागडे, रमाबाई प्रेमदास खोब्रागडे, तुकेश सोमेश्वर मेश्राम, उमाकांत विनोद जुमनाके, श्रीतेज झामदेव लांजेवार, मीना प्रदीप लोंढे, प्रशांत देवाजी बोरकर आधी लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजाराचे धनादेशाचे वितरित करण्यात आले. निधी वितरित करताना लोकनियुक्त सरपंच हेमराज लांजेवार, ग्रामसेवक योगेश कापगते, उपसरपंच जयेश लोंढे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शेंद्रे, पोर्णिमा बोरकर शेवंता बनसोड, सविता सयाम,आशाताई बोरकर आदींची उपस्थिती होती.