न्यूज जागर गडचिरोली,
गडचिरोली, दि. ०३/०६/२०२३
न्यायालयाने विरोधात निकाल दिल्याने संतप्त पी. आय. ने न्यायाधीशाच्या बंगल्यावर जाऊन शिवीगाळ, मारहाण करीत धमकी दिल्याप्रकरणी न्यायाधीशाचे वतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची चामोर्शी पोलीसांनी चौकशी करुन चामोर्शी चे तत्कालीन पी आय राजेश खांडवे यांचेवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आणि शनिवारी त्यांना चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी खांडवे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले होते. NewsJagar
दिनांक २१ मे गुरुवार रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक राजेश खांडवे हे न्यायाधीशाच्या बंगल्यावर गेले आणि आत घुसून न्यायाधीशांना अश्लील शिवीगाळ करून त्यांचे गालावर चापट मारून धमकी दिली. या घटनेची व्हिडिओग्राफी न्याधीशांच्या बंगल्यावर असलेल्या शिपायाने केली. त्या आधारावर न्यायाधीशांच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ती पूढे चामोर्शी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली.14 days judicial custody to Police Inspector Khandve
एप्रिल महिन्यात पार पडलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी दरम्यान माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन.डी. मेश्राम यांनी २० मे रोजी दिले होते. त्यामुळे संतप्त पी आय खांडवे याची न्यायाधीशाच्या बंगल्यावर जाऊन त्यांचेवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली. स्वतःच्याच कार्यालयात अधिकारी म्हणून वावरत असतांना मात्र त्याच पोलीस स्टेशन मध्ये खांडवे यांच्यावर गुन्हा नोंद होऊन न्यायालयीन कोठडीस सामोरे जावे लागले.