नागपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
नागपूर दि.०३/०६/२०२३
ओळखीच्या व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नरेंद्र धनराज वांढरे (४५, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच मुलीचे पालक घरातराहतात. नरेंद्रची तिच्या पालकांशी ओळख होती व त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. १ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नरेंद्र त्यांच्या घरी गेला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत स्वत:च्या घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे मुलगी रडायला लागली व शेजारी राहणाऱ्यांनी लगेच तिच्या पालकांना माहिती दिली. तिच्या आईने तिला विचारणा केली असता, तिने झालेला प्रकार सांगितला. NewsJagar
पालकांनी वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार केली, पोलिसांनी नरेंद्रविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला व त्याला अटक केलीआहे