श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
नागभीड , ०४/०६/२०२३
कारने एका खाजगी ट्राँव्हलसला नागभीड-नागपुर रोड वर कानपा गावा जवळ जोरदार धडक दिल्याने अल्टो कार मधील चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असुन दोन गंभीर असल्याने एकाला नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यातील मृत्यू झाला आहे.तर ९वर्षाच्या बालीकेला नागपुर येथे नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना रविवारला दुपारी ३.५० वाजता घडली असुन,गडचिरोली येथिल नागपुरला दररोज चालणारी खाजगी ट्राँव्हल नागभीड वरुन जात होती.तर नागपुर वरुन अल्टो कार नागभीड कडे येत असतांनाच कानपा गावा जवळ कारने ट्राँव्हल्सला जोरदार धडक दिल्याने हा भीषन अपघात झाला आहे. NewsJagar
मृतक रुषीकेश राऊत रा.नागपुर (२०), रोहन विजय राऊत रा.नागपुर(३०), गिता राऊत रा नागपुर (४५),सुनिता रुपेश फेंडर रा नागपुर (४०),यामीनी रुपेश फेंडर (९) रा.नागपुर, प्रभा सोनवाने (४०) रा लाखनी अशी मृतकांची नावे आहेत.हे सर्व जण ब्रम्हपुरी तालुक्यात येत असलेल्या किन्ही येथिल गावा कडे कौटुंबिक कामासाठी अल्टो कार क्रमांक एम.एच.४९ डि.आर.२२४२ या गाडीने येत होते.ते दुपारी नागपुर वरुन २वाजताच्या सुमारात निघाले होते.नागभीड -नागपुर या मार्गावरील कानपा गावा जवळ नागभीड वरुन येणाऱ्या ARB या खाजगी ट्राव्हल्स ने कारला जोरदार धडक दिल्याने त्या कार मध्ये बसलेल्या चार जणाचा जागीच मृत्यू झाला. ही अल्टो कार या परिवाराने घरा जवळील रोशन सदाशिव टागळे यांच्या मालकीची होती. यांना मागुन आणली होती. तर दोघा जणांचा दवाखान्यात नेत आसतांना मृत्यू झाला.घटना स्थळी क्षणात लोकांनी धाव घेतली.लगेच नागभीड पोलिस स्टेशनला या घटनेची माहीती देण्यात आली.नागभीड पोलिस घटना स्थळी पोहचुन कार मध्ये फसलेल्या मृतकांना बाहेर काढुन नागभीड शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले व घटनेचा पंचनामा करण्यात आला.खाजगी ट्राँव्हल्स मधील बसलेल्या प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे अशी माहीती आहे.भीषण अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.इतका मोठा अपघात या रोड वर पहील्यांदाच घडला असे बोलल्या जात आहे. या घटनेचा पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहे.