माझे घर वाचवा हो ! वृद्ध महिलेची पत्रकार परिषदेतून हाक- प्रशासनाची वृद्ध महिलेला न्याय देण्यास टाळाटाळ

Elderly woman's call from the press conference to save her home  Administration's are avoide  to give justice  
Elderly woman's call from the press conference to save her home  Administration's are avoide  to give justice  

श्री.अमित साखरे ,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

चामोर्शी,दि. ०७/०६/२०२३

प्रशासकीय अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी त्यांना नियुक्त केल्याचे नेहमीच प्रशासनातर्फे सांगण्यात येते , प्रत्येक राष्ट्रीय ,आणि प्रशासकीय योजनेत सुद्धा त्यांचा मोठा सहभाग असतो , नागरिकांच्या समस्या सोडविण्यात प्रशासनाचा हातखंडा असला तरी मात्र मुधोली येथील वृद्ध महिलेच्या समस्येची प्रशासनाने अजूनही दखल घेतली  नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  

मुधोली रीठ येथील झोपडी वजा घरात वास्तव्यास असलेल्या बिरजूलाबाई गंगाराम गोवर्धन वय 80 वर्ष या एकट्याच राहण्याऱ्या वृद्ध महिलेला धमकावून घर सोडून जाण्यास बाध्य करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे .  Elderly woman’s call from the press conference to save her home  Administration’s are avoide  to give justice  

सदर माहिला ही निपुत्रिक असून लग्न होऊन ती याच गावात अंदाजे 65 वर्षापासून ची रहिवासी आहे व पती गंगाराम गोवर्धन यांचे मयत झाल्यापासून ती एकटीच वास्तव्य करित आहे .

सदर महिला एक सिमेंटच्या मुंड्या गाढून टिनाच्या पत्र्याच्या घरात राहत आहे परंतु तिच्या घराला लागून असलेल्या गैरअर्जदार देवताळे परिवारांची जमीन आहे . यामध्ये मायाबाई गमतीदास देवताळे , मीनाक्षी खुशाल देवताळे , मंगला नरेश देवताळे , श्रावण गमतीदास देवतळे, निलेश मारुती मुरमाळे , नेताजी तुळशीराम देवताळे, गमतीदास रुषी देवताळे, हे अर्जदार वृद्ध महिलेला वारंवार धमकी देऊन घरांचे कुंपण काढून फेकणे , तुझ्या घराची विक्री आम्हाला कर अन्यथा घर सोडून निघून जा अशा पद्धतीची धमकी देत आहेत . याबाबत अर्जदार बिरजूलाबाई गोवर्धन यांनी गैरअर्जदाराविषयीची तक्रार आष्टी पोलीस स्टेशनला केली परंतु त्यांनी हा विषय महसूल कार्यालयाचा असल्याने तुम्ही चामोशी तहसील ऑफिसला तक्रार द्या असे सांगितले . त्यानुसार तहसीलदार यांना पत्र दिले असता त्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्याला चौकशी करण्याचे आदेश दिले .
यामध्ये सरपंच , तंटामुक्त समितीने आपले हात उंच केल्याने सदर महिलेनी दिनांक ०९/०५/२०२३ ला जिल्हाधिकारी साहेब ,पोलीस अधीक्षक , मुख्य कार्य पालन अधिकारी , उपविभागीय अधिकारी , गट विकास अधिकारी , प्रभारी पोलिस अधिकारी यांना निवेदन देऊनही एकही अधिकारी वा कर्मचारी हे मोक्यावर येऊन अर्जदाराची कोणतीही चौकशी केलेली नाही व न्याय देणार टाळाटाळ करत आहेत . त्यामुळे ह्या वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगायचे की शासनाच्या दारी पायपीट करायची ? हा मोठा यक्ष प्रश्न या महिलेसमोर असल्याने त्यांनी माझे घर वाचवा व मला न्याय द्या म्हणून पत्रकार परिषदेतून मागणी केलेली आहे .
या तक्रारीवरूनही मला न्याय न मिळाल्यास मी २० जून २०२३ पासून तहसील कार्यालय चामोर्शी येथे बेमुदत आमरण उपोषणास बसत असल्याबाबत सदर महिलेने दिलेल्या निवेदनातून व पत्रकार परिषदेतून मत व्यक्त केलेले आहे . NewsJagar 
याबाबत चामोर्शी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले कि विस्तार अधिकाऱ्यामार्फत सदर तक्रारीची मोका चौकशी करून यात कोण दोषी आहे याबाबतची चौकशी करून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली .