चामोर्शी
श्री अमित साखरे उपसंपादक , न्यूज जागर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र तीन दिवस साजरा करण्यात आला त्याचा समारोपीय कार्यक्रम येथील नगरपंचायत भवनात घेण्यात आला त्यावेळी चामोर्शी येथील कार्मल अकाडमी शाळेच्याच्या बँड पथकद्वारा राष्ट्रगीतातून ऐकात्मेचे दर्शन घडविले. असता उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पथकातील छोट्या मुलांचे कौतुक केले
आझदिका अमृत महोत्सव १३ आगाष्ट ते १५ आगाष्ट पर्यंत शहरातील विविध शाळा, कार्यालये, घरोघरी साजरा करत अनेक उपक्रम, स्पर्धा राबविण्यात आले होते. त्याचा समारोपीय कार्यक्रम येथील नगर पंचायतमध्ये घेण्यात आला त्यावेळी कार्मेल अकादमी शाळेच्या बँड पथकाला पाचारण करून नगरपंचायत प्रांगणात बँड पथक प्रमुख जोसेफ व सौजू सर यांच्या मार्गदर्शनात बँड पथकद्वरा राष्ट्रगीताची धून वाजवून ऐकात्मेचे दर्शन घडविले असता उपस्थित नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, सभापती प्रेमा आईंचवार, नगरसेवक गीता सोरते, न.प. लेखापाल जगदीश नक्षिने, शाखा अभियंता निखिल कारेकर, , मोरेश्वर पेंदाम, भारत वासेकर, अब्दुल असीम सय्यद, कार्मेलच्या शिक्षिका प्रीती वगरकर, दीप्ती वासेकर, बरेन मंडल, जोसेफ डोंगरे व नागरिक उपस्थित होते त्यांच्या द्वारा छोट्या मुलांचे कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापक रेव फादर आगस्टीन अलेंचरी, यांनीही बँड पथकाचे अभिनंदन केले.