मुल
प्रेसनोट
मुल तालुक्यातील समस्त आंबेडकरी जनतेला तसेच समस्त बहुजन बांधवांना सुचित करण्यात येते की, राजस्थान येथील जालौर जिल्ह्यातील एक दलित विद्यार्थी इंद्रपाल मेघवाल याला छैलासिंह या जातीयवादी शिक्षकाने त्याच्या माठातील पाणी पिल्याच्या कारणावरून अमानुष मारहाण केली. या मारहाणी सदर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
या घटनेचा निषेध करून सदर शिक्षकावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मुल तालुक्यातील विविध आंबेडकरी, बहुजन संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट २०२२ सकाळी १० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ताडाळा रोड पासून ते तहसील कार्यालय मुल इथपर्यंत भव्य मोर्चा निघणार आहे
तरी या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशांत उराडे, सुजित खोब्रागडे, सुरेश फुलझेले, बालू दुधे, आकाश दहिवले, अतुल गोवर्धन, डेव्हिड खोब्रागडे, किशोर घडसे,प्रज्योत रामटेके, स्वागत वनकर, पाटील वाळके, कैलास घडसे, अजय रंगारी, अनिकेत वाकडे तथा विविध आंबेडकरी संघटनेच्या व बहुजन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.