ब्रम्हपुरी प्रतिनिधी न्यूज जागर
चार नागरिकांची केली होती शिकार
मागील काही दिवसांपासून चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या हत्तीलेंडा, सायगाटा, दुधवाही, अड्याळ परिसरात वाघाचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज दि. 18/08/2022 रोजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सदर वाघास जेरबंद करण्यात यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
स्थानिय आमच्या न्युज जागरच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहिती नुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ परिसरात एका नरभक्षक वाघाने नागरिकांना ठार मारणे व जख्मी करण्याचा नित्यक्रम सुरु केला होता. त्यामुळे शेतशिवारात शेतीच्या कामाकरिता जाणारे, जंगलात गुरे चरायला नेणा-यांन सोबतच त्या परिसरातुन रहदारी करणाऱ्या नागरिकांना सुध्दा दिवसाढवळ्या त्याचे दर्शन होत असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन दिवस अगोदर हत्तीलेंडा परिसरात याच वाघाने एका नागरिकाची शिकार व एकाला गंभीर जख्मी केले होते. यासर्व घटनांची माहिती सबंधित नागरिकांनी लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांना माहिती दिली. दोन्हीही लोकप्रतिनीधिनी घटनेचे गांभीर्य ओळखुन उपवनसंरक्षक मल्होत्रा यांची भेट घेऊन वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली. त्याच्या मागणीला सकारात्मक कारवाईचे आश्वासन देऊन परिस्थितीचा विचार करता सबंधित उपवनसंरक्षक मल्होत्रा यांनी राज्याचे वन मंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याशी फोनवर चर्चा करून वाघास जेरबंद करण्याची विनंती केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मंत्री महोदयांनी वनविभागाला ताबडतोब वाघाला जेरबंद करण्यासाठी टायगर ट्राप चे निर्देश दिले व आज वनविभागातर्फे सबंधित परिसरात सापळा रचुन एका वाघाला जेरबंद करण्यात यश आले असून दुसऱ्या सुध्दा वाघाला लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन वनविभागातर्फे देण्यात आले. वनविभागाच्या या कारवाई बद्दल परिसरातील नागरिकांनी वनविभागाचे कर्मचारी, अधिकाऱ्यांसहित, वन मंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर यांचे आभार मानले.