जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी संपन्न.
चंद्रपूर
राणी दुर्गावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर मुलींची येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी मधुसूदन रुंगठा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी प्राचार्या कल्पना खोबरागडे , प्राचार्य श्री डांगे , श्री संजय कडू जिल्हा नियोजन अधिकारी चंद्रपूर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाधे आयोजक सौ. कल्पना खोबरागडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी आयटीआय मध्ये योग्य प्रशिक्षण घेऊन आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला. प्रदर्शनीचे उदघाटक
मधुसूदन रुंगठा यांनी प्रशिक्षणार्थी यांनी रोजगाराभिमुख कौशल्य संपादन करावे व सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय उभे करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले
या तंत्र प्रदर्शनीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधील 15 तालुक्यांनी सहभाग घेऊन प्रदर्शनी मध्ये विविध प्रकारचे अभियांत्रिकी, बिगर अभियांत्रिकी व नाविन्यता अशा प्रकारचे मॉडेल्स ठेवले होते. यामध्ये या तीन विभागातून प्रदर्शनीचे मॉडेल्स
विभाग स्तराकरीता निवडण्यात आले. पयॅवेक्षक म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील प्राध्यापक डॉक्टर चव्हाण , प्राध्यापक डॉक्टर डोंगरे,प्राध्यापक साखरे सर बिट्स मॅडम हे लाभले. अभियांत्रिकी ग्रुप मधून आयटीआय नागभीड व्यवसाय वीजतंत्री प्रथम पारितोषिक मिळालेला आहे तसेच द्वितीय पारितोषिक आयटीआय गोंडपिपरी व्यवसाय फिटर व तृतीय तृतीय पारितोषिक आयटीआय ब्रह्मपुरी व्यवसाय एमएमवी
बिगर अभियांत्रिकी ग्रुप मधून आयटीआय चंद्रपूर मुलींची व्यवसाय बेसिक कॉस्मेटोलॉजी तसेच द्वितीय पारितोषिक आयटीआयची चिमूर व्यवसाय शिवण व कर्तन व तृतीय पारितोषिक आयटीआय वरोरा व्यवसाय फॅशन टेक्नॉलॉजी
तसेच नावीन्यता गट मध्ये प्रथम पारितोषिक आयटीआय चिमूर व्यवसाय वेल्डर तसेच द्वितीय पारितोषिक आयटीआय चंद्रपूर मुलींचे व्यवसाय बेकरीअँड कॉन्फे. तृतीय पारितोषिक आयटीआय चिमूर व्यवसाय तारतंत्री यांना प्रमाणपत्र व शील्ड देऊन त्यांना गौरवण्यात आले
बक्षीस वितरण प्राचार्या कल्पना खोबरागडे व माननीय श्री डांगे सर तसेच चंद्रपूर तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती जयश्री देवकर यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री अब्दुल रतिफ आर ए किदवाई कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता संस्थेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांचासहभाग लाभला.