ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभिड येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित

अरुण बारसागडे (न्यूज जागर )नागभीड तालुका प्रतिनिधी

ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभिड येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित. करण्यात आली होती त्यामध्ये लोक विद्यालय सावरगाव शाळेने माध्यमिक आदिवासी गटातून द्वितीय क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर झेप घेतली. कु.आदित्य दिवाकर आंबोरकर वर्ग ९ वा अ या विद्यार्थ्यांने अतिशय सुरेख प्रदर्शन केले.

सदर स्पर्ध्येमध्ये प्रदूषण विरहित इंधनसहित बहुउद्देशीय चुल्हा या प्रोजेक्टचे प्रदर्शन करण्यात आले होते.
ह्या कार्यासाठी आमच्या शाळेतील शिक्षिका .कु.एस. एल ढोके मॅडम यानी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा कधीच कुठे कमी नसतात हे आमचे विद्यार्थी दरवर्षी दाखवून देतात. त्यांच्या अद्वितीय यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष,सचिव व शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व काही पालकांनी सहभागी विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन केले व कौतुकाचा वर्षाव केला.