पोळा व गणेशोत्सव शांततेत पार पाळा-पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे

पो.नी. बिपिन शेवाळे यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवहान ( फोटो )
चामोर्शी- कोरोना निर्बंध मुक्त केले असले तरी नागरिकांनी यावर्षीही पोळा व तान्हा पोळा , हरितालीका, श्री गणेश चतुर्थी , ऋषीपंचमी उत्सव शांततेत साजरा करावा व गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.

दि . २४ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पोलिस स्टेशनला शांतता कमेटीची सभा घेण्यात आली . त्यावेळी आयोजक म्हणून ते बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार संजय नागटिळक, प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे , पोहवा संदिप भिवणकर , यांच्या सह शांतता कमेटीचे सदस्य दिलीप चलाख , बबन वडेट्टीवार, अमित यासलवार, मनेश गांधी, विनोद खोबे , , जयराम चलाख , लतिफ खान, आमीर खान , साजीत शेख,, व्ही. एम. कुळमेठे, , छाया कोहळे , बबीता माहोरकर, संगीता साखरे आदी उपस्थित होते .

पुढे बोलताना . या वर्षी शासनाने सर्व उत्सव निर्बंध मुक्त केले असले तरी सार्वजनिक गणेशोत्व मंडळांनी प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे गरजेचे असून सर्व उत्सव शांतापूर्ण साजरे करणे आवश्यक असल्याचे सांगत गणेश मंडळांना अतिरिक्त माहिती परवानगी घेताना देण्यात येणार असून पोळा, तान्हा पोळा साजरा करताना कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी शांतता कमेटीच्या सदस्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे व पोळा सण उत्साहात साजरा करावा असे पोलीस निरीक्षक बीपीन शेवाळे यांनी सांगितले.

यावेळी  नगराध्यक्षा जयश्री वायलालवार यांनी, शहरात लहान मुले शहरात मोटारसायकल अतीवेगाने चालवताना त्यामुळे उत्सव काळात, इतर वेळेस अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी पोलिस प्रशासनाने यावर निर्बंध घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

तहसीलदार संजय नागटिळक यांनी उत्सव असोत की कुठलेही कार्यक्रम असो सर्वांनी सहकार्य केल्यास गावचा विकास शक्य असून कायदा सुव्यवस्था राखता येऊ शकतो असे सांगत उत्सव काळात अवैध दारू व्यावसायिकांवर नजर ठेवणे तेवढेच आवश्यक असल्याचे अध्यक्षीय भाषण केले . सूत्रसंचालन सुधीर साठे यांनी तर आभार संदीप भिवनकर यांनी केले यावेळीस पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते .