मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारवाईत सहा. अभियंता जांभुळे निलंबित

 

धानोरा तालुका प्रतिनिधी

गडचिरोली  जिल्ह्यातील  धानोरा येथिल जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले अभियंता (श्रेणी -२) के.एच.जांभुळे यांनी केलेल्या दारु पार्टी चे व्हिडिओ व सिडी तयार करुण त्यांची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प.गडचिरोलि यांचे केली होती.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुण त्यात सहाय्यक अभियंता जांभुळे हे दोषि आढळून आल्यानंतर त्यांना निलंबित करन्यात आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात  खडबड उडाली आहे. राजेश नाथानि यांचे सह सात कंञाटदारानि दिनांक २४जुन २०२२ ला मुख्य कार्यकारी अधिकारी , मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे  तक्रार केली होती की सहाय्यक अभियंता के.एच.जांभुळे यांनी धानोरा तालुक्यातिल दुर्गापुर गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पळसगाव येथिल सिमेंट क्रांकिट रोडच्या बांधकामावर रुबाब दाखवत दारु पाजण्याची मागणी करन्यात आली होती, सोबतच पार्टीचे आयोजन करन्यात आले. कारण पार्टि दिल्याशिवाय एम.२०चे क्राँक्रिटचे बांधकाम करु न देणाची धमकी सहाय्यक अभियंत्यानी दिली.याचे व्हिडिओ तयार करुण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे पाठविन्यात आले. संबंधित अभियंत्ता कामाचे बिल काढन्या करिता ५%रक्कमेची मागणी करतो.अशी देखिल तक्रार करन्यात आलि होती. सदर प्रकरणा बाबत चौकशी समिती नेमुन अधिक तपास केला असता असे निर्देशनास आले सहाय्यक अभियंता जांभुळे (श्रेणी- २) यांनी सादर केलेल्या खुलाशाचे अवलोकन करुण गैरवर्तन न केल्याचा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. त्याचा प्राप्त खुलासा असमाधाणकारक मानून त्यांनी नियमित कर्तव्यात कसुर करून महाराष्ट्र जि.प.जिल्हा सेवा वर्तणुक नियम १९६७ मधिल नियम ३ चा भंग केल्याचा ठपका ठेवत जि.प.बांधकाम उपविभाग धानोरा चे सहाय्यक अभियंता के.एच.जांभुळे यांना जि.प.सेवा शिस्त व अपिल नियम १९६४ मधिल नियम ३(१) नुसार सेवेतुन निलंबित करन्यात आले. त्यानंतर त्याचे मुख्यालय जिप बांधाकाम विभाग मनपा उपविभाग अहेरी पंचायत समिती येथे ठेवन्यात येत असून त्याना पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येनार नाही . जांभुळे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा ,निलंबण,बडतर्फ व सेवेतुन काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाणे नियम १९८१ चे नियम ६८ मधिल तरतुदी नुसार भत्ता अनुदेय राहील. तसेच नियम १९८१ नियम ६९ च्या पोटनियम (४) प्रमाणे कोणतीही नोकरी तथा धंदा करता येनार नाही.तसे केल्यास शिक्षेस पाञ राहतील.