मागील काही वर्षापासून प्रलंबीत असलेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या जमीनीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी राज्यपाल महोदयांना पत्र दिल्याचे आश्वासन वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डा. देवराव होळी व शिष्टमंडळाला दिले. गडचिरोली येथे सन2011 मध्ये चंद्रपुर व गडचिरोली करीता स्वतंत्र विद्यापीठ मंजूर झाले. त्याकरिता अडपल्ली-गोगाव येथील 64.50 हे. आर. जमीन खरेदीसाठी आरक्षित करून अधिग्रहणाच्या प्रक्रियेसाठी सन 2018 मध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातील काही शेतकऱ्यांना मोबदला सुध्दा देऊन त्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. मात्र काही शेतकऱ्यांच्या अधिग्रहण व हस्तांतरण अजून पर्यत झाले नाही. जमिनीचे अधिग्रहण शासनस्तरावरून प्रयत्न झाले मात्र निर्णय होवू शकला नाही. जमिन अधिग्रहण लवकरात लवकर व्हावे याकरिता मंत्रालयीन स्तरावर सोशल इम्फाक्ट असाइमेंट ( SIA ) च्या मंजूरीकरिता प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र त्या प्रस्तावावर अजूनही मंजूरी मिळाली नाही. परिणामी अंतिम टप्प्यात असणारी ही प्रक्रिया जिल्हाधिकारी यांचे कडून कोणत्याही सबळ कारणाशिवाय रद्द करण्यात आला. व नविन प्रक्रियेद्वारे जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पर्यत हि प्रक्रिया राबविता-राबविता 3 कुलगूरु व 3 जिल्हाधिकारीच्या बदल्या झाल्या परंतु विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न जैसे थे असल्यामुळे हा प्रश्न आतातरी लवकरात लवकर मार्गी लागले अशी आशा जिल्हावासी बाळगून आहेत.