देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

न्यूज जागर नागपूर प्रतिनिधी 

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी शहरात देहव्यापार चालविणाऱ्या टोळीला पकडण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाला यश आले.
आमच्या नागपूर प्रतिनिधीने दिलेल्या माहिती नुसार पारशिवनी शहरातील पारशिवनी-इटगाव मार्गावरील काकडे फँमिली रेस्टाँरंट, बार ॲड लाँजिंगवर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पथकाने धाड टाकून लॉज मालकासहित देहव्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या सात तरूणीना अटक करण्यात आली. या कारवाईत 6600 रूपये रोख व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक मीरा मटाले यांनी दिली. समोर सांगितले कि, सदर लॉज वर देहव्यापार चालत असून ग्राहकांसाठी तरूणीना बाहेरून बोलावले जात असल्याची गुप्त माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे या पथकाने मंगळवार दि. 23 आँगस्टला सायंकाळी त्या लॉजमध्ये बनावट ग्राहक पाठवून चाचपणी केली. आत देहव्यापार चालत असल्याची माहिती त्या ग्राहकाने देताच पथकाने धाड टाकली. त्यात लॉज मालक रामू उर्फ रामदास गुंडेराव काकडे ( 51, रा. प्रभाग -6 पारशिवणी ) यांच्या सह सात तरूणींना अटक करण्यात आली. यावेळेस त्याच्या कडून 6600 रूपये रोख व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पारशिवणी पोलिसांनी आरोपी विरोधात अनैतिक मानवी वाहतूक कायदा 252/2022 कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा नोंदवीला असून पुढील तपास रामटेक पोलिस स्टेशन चे PSI प्रमोद मुक्तेश्वर करीत आहे.

1500 रूपयांत सौदा
सदर प्रकरणातील बनावट ग्राहकाने लॉज मध्ये जाऊन 1500 रुपयात सौदा केला. लॉज मालकाने रक्कम स्विकारताच साध्या वेश्यातील पोलिसांनी धाड टाकली. अटक करण्यात आलेल्या तरूणी 19 ते 32 वयोगटातील असल्यामुळे त्यांना पारशिवनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले .

शहरातील अन्य लॉज वर सुद्धा चालतो देहव्यापार
या सबंधात आमच्या प्रतिनिधीने नागरिकांन कडून प्रतिक्रिया घेतली असता. परिसरातील नागरिकांनी सांगितले कि, तालुक्यात कन्हान-मनसर, पारशिवनी-खापरखेडा, रामटेक-सावनेर, कन्हान-तारसा, आमडी फाटा-नागपूर महामार्ग, पारशिवनी-चारगांव या मार्गावरील बहुतांशी लॉजवर खुलेआम देहव्यापार केला जात असून, तरुण-तरूणींना शरीर संबंधासाठी सहज रूम उपलब्ध करून दिल्या जातात. यात शाळा-महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा लोंढा अधिक असल्याचे सुध्दा नागरिकांनी सांगितले.