धार्मिक उत्सव च्या माध्यमातून बाल गोपाल यांना प्रोत्साहन देण्याचा चामोर्शी नगर पंचायत चा उत्कृष्ट प्रयत

चामोर्शी तालुका प्रतिनिधी न्यूज जागर
चामोर्शी दिनांक – 27 आगष्ट 2022
नगरपंचायत चामोर्शी येथील काँग्रेस , राका ,भाजपा ,नगरसेवक, नगरसेविका यांच्या संयुक्त प्रयत्नाने भव्य तान्हा पोळा नंदीबैल सजावट व साजेशी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन काँग्रेस नगर पंचायत महिला व बाल कल्याण सभापती अडव्होकेट सौ प्रेमा ताई , आइंचवार यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी
आमदार डॉ होळी व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते विजेत्या बालगोपाल यांना विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले
तान्हा पोळ्याच्या माध्यमातून लहान मुले विविध धार्मिक वेशभूषा परिधान करून नंदीबैलाची सजावट करून एकत्रित येतात यातून आपल्या धार्मिक संस्कृतीचे उत्तम सामाजिक धार्मिक दर्शन घडत असते या उद्देशाने लहान बाल गोपाल यांना प्रोत्साहन देण्यासाठी
नगरपंचायत चामोर्शी येथील पदाधिकारी ,नगरसेवक, नगरसेविका यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहाने हा भव्य तान्हा पोळा नंदीबैल सजावट व साजेशी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
यावेळी चामोर्शी नगरपंचायतीच्या काँग्रेस नगराध्यक्ष सौ. जयश्रीताई वायलवार, काँग्रेस न,प, उपाध्यक्ष लोमेश बुरांडे,भाजपा नगरसेवक आशीष पिपरे , काँग्रेस नगर सेवक सुमेध भाऊ तुरे , अमोल भाऊ गण्यारपवार , पोलीस निरीक्षक शेवाळे , केवळराम हरडे महाविद्यालयाचे प्राचार्य बनपूरकर सर , काँग्रेस नगरसेविका प्रेरणाताई आइंचवार ,रा,का, नगरसेविका गेडामताई , काँग्रेस नगरसेविका सातपुते ताई, भाजपा नगर सेविका सोनाली ताई पिपरे ,चामोर्शीचे पोलीस उपनिरीक्षक साठे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप नगर सेवक आशीष भाऊ पिपरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश खेवले यांनी केले
यावेळी उपस्थितांना आ,होळी व मान्यवर यांनी उपस्थित बाल गोपाल व उपस्थित पालक यांना मार्गदर्शन केले,
यावेळी आमदार देवराव होळी व मान्यवर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाचे आभार अमोल भाऊ गण्यारपावार यांनी केले ,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न,प, चामोर्शी येथील नगर सेवक नगर सेविका व पदाधिकारी व कार्यकर्ते कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले