जावेद कुरेशी आणि शौकत पंजवाणी यांचा समाजवादी पक्षात प्रवेश 

जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर 

जावेद कुरेशी यांच्या समाजवादी पक्ष प्रवेशाने  अनेक मोठ्या राजकारण्यांना झटका

देसाईगंज-
देसाईगंज येथील समाज सेवक जावेद कुरेशी आणि देसाईगंज येथील प्रतिष्ठित व्यावसाईक आणि समाज सेवक शौकत पंजवाणी यांनी देसाईगंज या ठिकाणी एका कार्यक्रमा दरम्यान समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सीधीकी यांच्या हस्ते आणि जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात जाहिर प्रवेश केलेला आहे.

जावेद कुरेशि आणि शौकत पंजवाणी यांच्या जाहिर प्रवेशाने अनेक मोठ्या राजकारण्यांना झटका लागला असल्याची चर्चा देसाईगंज शहरात सुरू आहे,  जावेद कुरेशी यांनी मागील नगर पालिका निवडनुकीत बी आर एस पि कडून तिकिट घेऊन निवडणूक लढविली होती , समाजवादी पक्षात प्रवेश घेतल्यानें जावेद कुरेशि आणि शौकत पंजवाणी यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रवेश कार्यक्रम वेळी जिल्हा अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष खलील खान, आमीर यासिणि, फैजान पटेल, सपना आत्राम, लता मेश्राम,महेबूब खान, जाफर शेख,मुजीब शेख,जीब्राइल शेख,राजेश पतरंगे,उमेद अली सय्यद आदी उपस्थित होते.