श्री.निखिल दुधे , सावली तालुका प्रतिनिधी न्यूज जागर
सावलीत अपघात
प्रा. दिवाकर उराडे सावली मूळ वरून सावली ला येत असतांना , सावली बस स्थानकाजवळ गाडीचा डाव्या बाजूचा टायर फुटल्यामुळे कारने ऑटोला धड़क देऊन फुटपाथवर गाडी चढली , गाडीची वाट पाहत बाजूला उभ्या असलेल्या लता कोमलवार लोढोली {५५ वर्ष}, आणि ऑटोचालक एकनाथ शेंडे[४३] , जखमी झाले , तसेच कारमधील योगिता उराडे[३९] या सुद्धा जखमी झाल्या, जखमींना ग्रामीण रुग्णालय सावली येते उपचारासाठी नेण्यात आले आहे असता लता कोमलवार लोढोली {५५ वर्ष} या महिलेला चंद्रपूर येथे हलविण्यात आले .