गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
राधेश्याम बाबा मंदिराजवळील घटना
दोन युवक जखमी
गडचिरोली धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या राष्ट्रीय महामार्गावर अनेक लहान मोठे खड्डे आहेत, असेच खड्डे राधेश्याम बाबा मंदिर जवळील कठाणी नदीच्या जवळ पडलेले असून एका बाजूने दोन वर्षा पूर्वी बांधलेली संरक्षण भिंतच वाहून गेलेली आहे, त्यामुळे मोठे खड्डे पडलेले आहे या खड्ड्यामुळे येना जाणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . या खड्डयांमुळेच या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत ,सकाळी दोन युवक धानोरा वरून गडचिरोली ला जात असताना त्यांच्या दुचाकीचा खड्ड्यामुळे अपघात होऊन पडले, जखमी युवकांना उपचाराकरिता धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले व पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथे जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे
पवन कुमरे व लोकेश कुमरे असे जखमी युवकाचे हे दोघेही mh33 ए इ ५००२ या क्रमांकाच्या गाडीने धानोऱ्याहून गडचिरोलीला जात असताना राधेश्याम बाबा मंदिर जवळील असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पडून अपघात झाला अपघाताची माहिती गणेश कुळमेथे यांना मिळताच लगेच त्यांनी ॲम्बुलन्स बोलावून ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात परंतु त्यांचे प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले
कठाणी नदी ला लागून संरक्षण भिंत बांधण्यात आली होती परंतु ती संरक्षण भिंत तुटून यावर्षी रोडवर खड्डे पडले कठानी नदीपासून ते राधेश्याम बाबा पर्यंत ची गाडी काढताना दुचाकी व चार चाकी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे अशातच दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व खड्ड्यांमध्ये जाऊन पडले व अपघात झाला.
राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याची बातमी वारंवार वृत्तपत्रांमधून लावून सुद्धा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे अजून किती लोकांचे अपघात होऊन बळी घेण्याचे वाट पाहत आहे ? बळी घेतल्यावरच प्रशासन याकडे लक्ष देईल का? असा संतप्त सवाल जनता करू लागली आहे
अजून पर्यंत या समस्येची दखल कुणीही घेतली नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल