उपरी येथील मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना खा.अशोकजी नेते यांनी भेट देऊन सांत्वन केले

श्री. निखिल दुधे , सावली तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर 

 

सावली:- उपरी येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते स्व.मधुकर पत्रुजी मोहूलै वय ५५ वर्ष यांना दोन दिवस आधी ताप आले होते.या तापाच्या अल्पशा आजाराने त्याचा मृत्यू झाला.कुटुंबातील कमावता व्यक्ती गेल्याने गावात हळहळ  व्यक्त केल्या गेले.

तसेच उपरी येथील घडलेल्या घटनेच्या संबंधित माहिती तालुकाध्यक्ष अविनाश पाल व भाजपाचे युवा नेते किशोरजी वाकुडकर यांनी माहिती दिली असता यांची दखल घेत या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी याबाबतचे गांभीर्य लक्षात घेत उपरी येथील मृत्यू् पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन कुटुंबियाचं सांत्वन केल.

यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी यांना खा.अशोकजी नेते यांनी दूरध्वनीवरून या संदर्भाची दखल घेत उपरी येथे आरोग्य शिबिर,आरोग्य तपासणी कॅम्प घेण्याच्या सूचना केल्या.

तसेच संबधीत स्व.चरण कोठारे वय ४५ वर्ष हे व्यक्ति अल्प भूधारक असल्याने कर्ज व कुटुंबाची जबाबदारी या विवंचनेतून त्याचा मृत्यू झाला.याची सुद्धा माहिती मिळताच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी मृतकाच्या परिवारांची घरी जाऊन आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले.

या प्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, अविनाश पाल तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा, संतोषभाऊ तंगडपलीवार माजी सभापती जि.प.चंद्रपूर,सौ.योगिता धनराज डबले माजी जि.प.सदस्या, भालचंद्रजी बोदलकर भाजपाचे जेष्ठ नेते,गणपतजी कोठारे माजी.पं.स. कुनघाडकर सर सामाजिक कार्यकर्ते,किशोरजी वाकुडकर भाजपाचे युवा नेते,डियेचजी आभारे युवा नेते,खुशालजी बोदलकर संचालक कृ.उ.बा स. सावली,शामसुंदरजी सा.चिटमलवार,वासुदेवजी सातपुते सामाजिक कार्यकर्ते,बाबुराव भुरसे, पुरुषोत्तम मोहुरले, धनराज भांडेकर सुरेश भांडेकर,गणेश कोहळे,दामोदर मांडेकर,तसेच अनेक भाजपाचे कार्यकर्ते,पदाधिकारी,गावातील मंडळी, उपस्थित होते.