श्री.अरुण बारसागडे , जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
सावली तालुक्यातील मायडोगरी येथील मनोहर निंबाजी गुरुनुले वय 62 वर्ष, सौ. शारदा मनोहर गुरुनुले वय 50 यांचा मागील काही दिवसापासुन जागेच्या वादात लहान भाऊ धनराज निंबाजी गुरुनुले वय 52 वर्ष यांच्या सोबत वाद होत होता. यातुन नेहमी छोटे मोठे वाद होत होते, मात्र आज 5 सप्टेंबर रोजी दोघां भावांमध्ये चांगलेच भांडण झाले. यातच लहान भाऊ धनराज गुरुनुले यांने सख्खा मोठा भाऊ मनोहर गुरूनुले व वहीणी शारदा गुरूनुले यांना सब्बलीने मारहाण केली. सदर मारहाणीत मनोहर गुरुनुले हे जागीच ठार झाले तर शारदा गुरुनुले यांचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला.
सदर घटनास्थळावर पाथरीचे पोलीस निरीक्षक मंगेश मोहड यांनी आपल्या पथकासह जावुन पंचनामा केला व आरोपी धनराज गुरुनुले यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर कलम 302, 307 हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.