श्री. अरुण बारसागडे , चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
कोठारी येथील ६७ वर्षीय महिलेची फेसबुकवरून गोंदियाच्या ४५ वर्षीय पुरुषासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाचे तार जुडले व दोन वर्षापर्यंत निरंतर सुरू होते. विश्वास संपादन केल्यानंतर घरी येणे-जाणे सुरू झाले व एक दिवस फेसबुक फ्रेंड्स आपल्या वयोवृद्ध मैत्रिणीला हळूवार दगा देत १० लाख किमतीचे २५ तोळे सोने घेऊन पसार झाला. ही घटना बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात उघड झाली आहे.
कोठारी गावातील ६७ वर्षीय विधवा महिला असून तिला एक मुलगा असून नोकरीनिमित्त बाहेर आहे. महिला घरी एकटी राहत असते. तीन वर्षांपूर्वी गोंदिया येथील सुमित बोरकर नामक ४५ वर्षीय पुरुषासोबत तिची फेसबुकवरून मैत्री झाली. त्याने आपण एमबीबीएस डॉक्टर असून अकोला येथे कार्यरत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व तो अधूनमधून कोठारीत येऊन मुक्काम करायचा. हा प्रकार मागील तीन वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा गावात आहे . त्यांचे व्हाटसॲप व फेसबुकवरून बोलणं सुरु होते , यादरम्यान त्याने एकदा घरी मुक्काम केल्याची कबुली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिली आहे. आरोपी कोठारीत सदर महिलेच्या घरी ३० ऑगस्टला आला. तक्रारकर्त्या महिलेच्या घरी मुक्कामी राहून रात्रभर तिचे घरी योग्य संधीची प्रतीक्षा करीत निवांत झोपला. ३१ ऑगस्टला नेहमीप्रमाणे महिला पहाटे ५.३० वाजता बाहेर फिरायला जात असल्याचे मित्राला सांगून निघून गेली. या संधीचा फायदा घेत आरोपी महिलेच्या घरून २४.७ तोळे सोने घेऊन बल्लारपूरच्या फरार झाला. महिला फिरून घरी परतली तेव्हा तिला तिचा मित्र दिसला नाही. घरातील कपाट तपासले असता त्यातील सोन्याचे दागिने लंपास झालेले दिसले. तत्काळ महिलेने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून कोठारी पोलिसांनी भांदवी ३८० कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे. सोन्याची किंमत ९ लक्ष ८८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी चौफेर नाकाबंदी केली; मात्र आरोपी कुठेही आढळून आला नाही. आरोपी फरार असून त्याचा कसून शोध पोलिस स्टेशन कोठारी चे प्रभारी ठाणेदार प्रमोद रासकर व त्यांची चमू घेत आहेत.