प्रेसनोट
सुरजागड लोह प्रकल्पामध्ये होत असलेल्या अवैध उत्खनन, एटापल्ली ते सुरजागड येथे वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता केलेल्या नियम बाह्य कामाची सखोल चौकशी करून लोह कंपनी, सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्यावर कठोर कारवाई करावी: डा नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विभागीय अध्यक्ष बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ गडचिरोली यांची मागणी
सुरजागड लोह प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे.या अवैध उत्खननामुळे व प्रकल्पातून उत्खननाद्वारे काढणाऱ्या लोह खनीजानी पाणी खराब होत असल्यामुळे ते वाहते पाणी छोटे नाली , नदी व इतर जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात साठवून शुद्ध पाणी अशुद्ध होत आहे.याचे दुष्परिणाम मानव जातीला, मौल्यवान वनस्पती, वन्य प्राणी व जलचर प्राणी जीवावर मोठ्या प्रमाणात होऊन जैविक विविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
यामुळे पर्यावरण नष्ट होणे व जलप्रदूषण व वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भविष्यात मौल्यवान वनस्पती, वन्यजीव, जलचर प्राणी व मानव जातीला गंभीर व दूर्दर आजार होऊन मानव व वन्यजीव यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून खालील महत्वपूर्ण मुद्द्याची सखोल व निष्पक्षपणे चौकशी होणे अपेक्षित आहे.
१)सुरजागड लोह प्रकल्प येथे होत असलेल्या उत्खनन क्षेत्रांचा वनविभागाकडून किती एकर जागेचा ताबा कंपनीला दिला आहे.आणी वनविभागाकडून दिलेल्या जागेतच उत्खनन होत आहे किंवा त्यापेक्षा जास्त जागेत आहे याची चौकशी करणे
२) वनपरिक्षेत्रामध्ये सूरजागड लोह कंपनीने अवैध बोरवेलचे जागोजागी खोदकाम केलेले आहे.
३) एटापल्ली ते सुरजागड लोह कंपनीने वनरोड मुख्य रस्ता परवानगी न घेता रूंदीकरण करणे.
४)सुरजागड पहाडीवर बिगर परवानगीने टाॅवर उभारणे
५)लोह प्रकल्पामुळे जलस्त्रोताचे जल प्रदुषण व वायूचे वायूप्रदूषणामुळे कॅन्सर,आस्थिमा आणि अन्य गंभीर आजार भविष्यात होण्याची शक्यता आहे.यांचे वैद्यकीय मंडळाकडून तपासणी केलेला अहवालाची चौकशी करणे
६)बांडीया नदी ते लोह प्रकल्प सुरजागड ते चेक नाका पर्यंत वनक्षेत्रातून विनापरवानगी पाईप लाईन टाकणे
७) वनक्षेत्रामध्ये अवैधरित्या उभारलेल्या चेकपोस्ट नाक्याची चौकशी करणे
८) एटापल्ली ते सुरजागड प्रकल्प पर्यंत विनापरवानगीने केबल वायर टाकणे
९) वनक्षेत्रात याच ठिकाणी लोहखनिज डंपिंग साठवून ठेवणे आदि बाबींची सखोल चौकशी करणे तसेच
लोह कंपनी व वरिष्ठ वन अधिकारी यांनी वन्यजीव संरक्षण संरक्षण कायदा १९७२, वनसंरक्षण कायदा १९८०, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, पाणी प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम १९७४, हवा प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम १९ ८१, १९७६ घटना दुरुस्ती अनुच्छेद (५१ अ) प्रमाणे (भारताच्या प्रत्येक नागरिकाने वने,तळी , नद्या व वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व विकास करणे अशी तरतूद आहे.)
घटना कलम अनुच्छेद (४८अ ) प्रमाणे राज्यातील पर्यावरणाचे संरक्षण आणि विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि देशाची वने व वन्यजीव यांचे संरक्षण करणे अशी तरतूद आहे.आणी (१९९३) च्या मानव अधिकार संरक्षण कायदा आदि महत्वपूर्ण कायद्याचे लोह कंपनी कडून व भामरागड वन विभागाचे वरिष्ठ वन अधिकारी व एटापल्ली वनपरिक्षेत्राधिकारी व वनपाल व वनरक्षक यांच्या संगनमताने भ्रष्टाचारपायी मानव,वन व वन्य जीव व देशहित संविधानीक कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.
सदर प्रकरणास एटापल्ली वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक भामरागड वनविभाग यांच्यावर जबाबदारी निश्चित करून यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी आणि सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सदर प्रकरण (दक्षता) विभाग,वनवृत गडचिरोली यांच्याकडे तात्काळ दयावे.तसेच सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यासाठी आदेशित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.