ग्रामपंचायत सदस्यांनी लावला विक्रमपूर ग्रामपंचायतीला ताला

चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर 

आता सरपंच जर लाच मागू लागले तर गावकऱ्यांनी कोणाकडे पाहयचे ?  ग्रामस्थ यांचा प्रश्न.

सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांची निवेदनातून मागणी

चामोर्शी– पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जयनगर/ विक्रमपूर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करत असल्याने ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य कंटाळून विक्रमपूर ग्रामपंचायतीला ताला लावण्यात आला होता. या बद्दल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चारही गट ग्रामपंचायत मधील सर्व गावकऱ्यांनी दिनांक जयनगर /विक्रमपूर ग्रामपंचायत येथील सभा घेऊन तीव्र विरोध दर्शविला आहे.

वेळोवेळी नागरिकांच्या समस्या व विकास कामे सांगून सुद्धा त्यांच्या पाठपुरावा करून कामे होत नव्हती तसेच घरकुल यादीमध्ये सरपंच ग्रामसेवक संगमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला केला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य व या वेळेस गाववासियांना दिली आहे.याप्रकरणी योग्य चौकशी करुन संबधित सरपंच ग्रामसेवका विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी व नागरीकांना न्याय् मिळावा या करीता गट ग्रामपंचायत जयनगर/ विक्रमपुर ग्रामपंचायत येथील नागरिकांनी मोठे पाऊल उचलून ग्रामपंचायत विक्रमपूर येथे ताला लावण्यात आले होते व तसेच विक्रमपुर येथे बैठक घेण्यात आली होती.या वेळेस विक्रमपुर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चारही गावातील नागरिकांचा समावेश होता.या वेळेस संबंधित चामोर्शी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी दूरध्वनी व्दारे संपूर्ण घटनेची माहिती देऊन बोलविण्यात आले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी व भ्रष्टाचाराबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली.

 


या वेळी गट विकास अधिकारी यांनी आमच्याकडे अजून पर्यंत लिखित निवेदन आम्हाला मिळालेलं नाही आम्हाला तुम्ही लिखित निवेदन द्या व त्यानंतर आम्ही एक कमिटी नेमणूक करून चौकशी करू अशे आश्वासन दिले व चौकशीमध्ये ग्रामसेवक भ्रष्टाचार केलेला आढळल्यास पुढील कारवाई करू अशे या वेळेस सांगितले या वेळेस उपस्थीत जयनगर/ विक्रमपुर व गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चारही गावातील ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. समाधानकारक उत्तर मिळाल्याने विक्रमपूर ग्रामपंचायती चे ग्रामस्थांनी यावेळेस समाधान व्यक्त केला व ग्रामपंचायतीचे ताला यावेळेस काढण्यात आले. या वेळीं उपस्थीत ग्रामपंचायत विक्रमपूर चे ग्रामपंचायती उपसरपंच, सदस्य ,नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते