वाढोणा येथे कोहळी स्नेहमीलन सोहळा पार पडला

श्री.अरुण बारसागडे,जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर.

कोहळी समाज बहुउद्देशीय मंडळ तळोधी (बा) तालुका नागभीड च्या वतीने 18 सप्टेंबर 2022 रोजी वाढोणा येथे गुणवंत विद्यार्थी, यशवंत व्यक्ती यांचा सत्कार व कोहळी स्नेहमिलन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. मनोहरराव आनंदे से.नि. मुख्याध्यापक वाढोणा, तर विशेष अतिथी म्हणून मा. ओमप्रकाश संग्रामे उपमुख्याध्यापक गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली, मा. नीरज शहारे राज्यकर निरीक्षक भंडारा, नानाजी बोरकर, राजू बन्सोड, सुखदेव भाकरे, नागभीड तालुक्यातील कोहळी बांधव व मंडळाचे सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आनंदे सर यांनी कोहळी समाजाबद्दल माहिती सांगुण संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे,तसेच मंडळाला काही सूचना दिल्या तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.ओमप्रकाश संग्रामे सर व नीरज शहारे सर यांनी कोहळी समाजातील मुलांनी शिक्षण क्षेत्रात ठसा उमटवून स्पर्धात्मक परिक्षेकडे जास्त वळावे व स्पर्धा परीक्षेची तयारी करून मोठे अधिकारी व्हावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, यशवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धनंजय बोरकर यांनी केले, सूत्रसंचालन सौ. मोनाली घोनमोडे यांनी तर आभार श्री सुखदेव भाकरे सर यांनी मानले.