नगर पालिकेने सेफ्टी टॅंक क्लीनर गाड़ी खरेदी करावी.-नगर सेवक मिलींद खोब्रागडे

आरमोरी नगरपरिषद अंतर्गत येणारा एक विभाग म्हणजे आरोग्य विभाग या विभागाच्या माध्यमातून आरोग्य आणि स्वचतेच्या सुविधा पुरविल्या जातात त्यांच्याच एक भाग म्हणजे गरजूंच्या मागणीनुसार विशिष्ट दराचा भरणा करून गटार सफाई केले जाते, परंतु आरमोरी नगरपरिषद ला असलेली गटार सफाई सेफ्टी क्लीनर टॅंक ही ग्रामपंचायत काळा पासुनची जुनी असल्याने आणि बिघडलेली असल्याने तिला वारंवार दुरुस्त करूनही ती उपयोगात येत नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील अनेक लोकांची मागणी येत असूनही सुद्धा ही सुविधा पुरवण्यात येत नाही आहे, आरमोरी नगर परिषद झाल्याने आणि लोकसंख्येच्या वाढीने तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्याचप्रमाणे जुन्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सेप्टिक टॅंक क्लीनर ची आवश्यकता भासत आहे आणि नगरपालिकेत असलेले सेफ्टी टॅंक ही भंगारलेली असल्याने आणि बाहेरुन बोलावलेल्या गाडिला जास्त पैशे द्यावे लागते. वेळेवर गटार सफाई होत नाही आणि त्यामुळे त्या गटारातील पानी नालीला सोडल्या जात आहे, असे प्रकार घडत असल्याने दुर्गन्ध वाढत असून नाल्या मधे डासाँचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, शहरात डेंगू, मलेरियाचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्याच्या मोठ्या समश्या निर्माण होत आहेत. जनतेला बाहेरून जास्त दराचा भरणा करून सेफ्टी टॅंक क्लीनर ची गाडी बोलवावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे, नगरपालिकेने नवीन सेफ्टी टॅंक क्लीनर गाडी खरेदी केल्यास शहरातील लोकांना जास्तीचे पैसे न भरता वाजवी पैशात गटार सफाई करता येईल, तसेच नगरपालिकेने ही गाडी खरेदी केल्यास नगरपालिकेला सुद्धा आर्थिक सोर्स उपलब्ध होईल.
त्यामुळे नगरपालिकेने जनहिताचा विचार करून सेफ्टी टँक क्लीनर ची तात्काळ खरेदी करावी अशी मागणी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केलेली आहे.