धानोरा तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
धानोरा,22 सप्टेंबर
तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ग्रामपंचायत पयडी येथील ग्रामसेविका चालू आठवड्यात एकदाच उपस्थित असल्याने ग्रामपंचायतला आल्याशिवाय दाखले मिळत नसल्याची खंत उपस्थित गावकरी व्यक्त केले, गल्ली ते दिल्ली पर्यंतचा कारभार हा ग्रामपंचायत मधूनच चालतो मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायती मधूनच दिल्लीपर्यंत चे काम केल्या जाते मात्र विकासात्मक कामासाठी शासनाने नेमणूक करून ठेवलेल्या मिनी मंत्रालयातील ग्रामसेविका अनुपस्थितीमुळे येथील विकास कामाचा बोजबारा वाजला आहे,
येथील ग्रामसेविका कुमारी गीता परचाके चालू आठवड्यात फक्त मंगळवारलाच ग्रामपंचायत मध्ये उपस्थित होत्या त्या पण शासकीय वेळेनुसार पूर्णवेळ उपस्थित नव्हत्या, त्याचप्रमाणे आज सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका उपस्थित नसल्याने उपस्थित ग्रामवासियांना विचारणा केली असता आठवड्यातून एक किंवा दोनदाच ग्रामसेविका कार्यालयात उपस्थित राहत असतात, आम्हाला काही शासकीय कागदपत्राची आवश्यकता लागल्यास 104 किलोमीटर वरून ग्रामसेविका ग्रामपंचायत ला आल्यानंतरच दाखला किंवा इतर कामे केल्या जातात, संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा नेहमीच करतात अशी खंत गावकऱ्यांनी उपस्थित केले.
संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाचे वेतन काढतात की अनुपस्थित असतानाचे वेतन काढतात की उपस्थित अधिक अनुपस्थितीत असतानाचे वेतन काढतात हा पण प्रश्न उपस्थित होतो, ग्रामसेविका एकशे चार किलो मीटर वरून येतात, ग्रामसेविका कुमारी गीता परचाके ह्या चामोर्शी वरून गडचिरोली ते धानोरा तालुक्यातील अतिदुर्ग भाग असलेल्या पयडी या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका या पदावर आहेत, चामोर्शी ते पयडी हे अंतर तब्बल 104 किलोमीटरचे आहे, शासन नियमावलीत कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहावे असे शासनाचे परिपत्रक असताना सुद्धा येथील ग्रामसेविका ह्या एवढ्या अंतरावर येजा करतात हे सुद्धा गांभीर्याची बाब आहे याकडे आता तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय असाही प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवळ्याचा उडतोय फज्या,राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेची कामे विहित वेळेत व विहित मुदतीत होण्यासाठी राज्य शासनाने 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर 22 पर्यंत शासन परिपत्रक काढले असून त्यात कोणत्याच प्रकारची हय गय करता कामा नये अशाही सूचना शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे मात्र अशा कित्येक जबाबदार कर्मचारी अनुपस्थित असल्याने जनतेचे कामे शासनाच्या परिपत्रकानुसार होतच नाही शासनाचे कर्मचारी केराची टोपली दाखवत आहेत
ग्राम विस्तार अधिकारी पंचायत लुमदेव जुवारे यांना फोन द्वारे विचारना केली असता नियमामध्ये जे बसेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले, जर उपस्थित नागरिकांनी लेखी तक्रार दिले तर फारच छान होईल जेणे करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल,