निष्कृष्ठ दर्जाचे पूल बांधकाम अखेर दोन महिन्यातच खचला, अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाही करा.

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर 

अखेर तो धामणगाव माल ला जाणारा घोडझरी तलावाच्या नहराचा नवरगाव – गडबोरी वितारिकेचा नविन पूल खचला.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामधील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या जंगलव्याप्त धामणगाव माल या गावात जाणारा व नवरगाव – गडबोरी वितारिकेचा घोडझरी नाहराच्या पुलाचा काम निष्कृष्ठ दर्जाचा होत असल्याने संबंधित कामावर हजर असलेल्या कंत्राटदाराच्या माणसाला काम व्यवस्थित होत नसल्याबाबत गावातील नागरिक तक्रार केली होती त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे गावातील नागरिकांचे म्हणणे होते.

मात्र सदर कामावर घोडझरी सिंचन विभागाचे अधिकारी व तांत्रिक अधिकारी नेहमी उपस्थित राहत असून सुद्धा काम निष्कृष्ठ दर्जाचे होत असल्याचे धामणगाव माल येथील नागरिकांचा आरोप होता.
पुलाचे बांधकाम करीत असतांना त्यामध्ये खाली मोठ्या गिट्टीचा मास कांक्रेट केला असून त्यावर दोन भोंगे टाकले व दोन्ही बाजूने त्याला सिमेंट गिट्टीची भीत टाकली मात्र कुठेच सलाख चा वापर केला नाही. भिंत उभी करतांना कॉलम घेतलेले नाही. व पूल बनताच पुलाच्या भिंतीने क्रॅक घेतलेल्या आहेत. फक्त लोकांना दाखविण्यापूर्त आता वरच्या भागाला सलाख टाकून भीम भरण्यात आले.

सिंचाई विभागाच्या माध्यमातून या पुलाचे काम करण्यात आले परंतु पुलाच्या कामात सिमेंटचा वापर कमी झाला असून मातीमिश्रित वाळूचा समावेश असल्याने या कामाचा दर्जा घसरला आहे. अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून थातुरमातुर पद्धतीने पुलाचे काम केल्याचा आरोप धामणगाव माल येथील नागरिकांकडून केला जात आहे. या कामाचे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली होती.

पुलाच्या दोन्ही बाजूने मोठमोठे तडे जाऊन भेगा पडल्या होत्या. त्यामुळे पुलाची दुरूस्ती करणे गरजेचे होते अन्यथा पावसाच्या व नहराच्या पाण्याने पूल वाहून जाण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केले होते व अखेर आज तेच झालं कालच्या सततधार पावसामुळे महिन्याभरात बांधलेला नवीन पूल आज एकबाजूने पूर्णपणे खचलेला आहे. जेव्हा पूल बांधकाम सुरू होते तेव्हाच या पुलाबाबत घोडझरी सिंचाई विभागाचे अधिकारी श्री. जुणूनकर यांच्याशी संबंधित पुलाबाबत बोलले असता पुलाचे काम व्यवस्थित होत असल्याचे व्यक्त केले होते. मात्र आता नवीन पूल एकबाजूने पूर्णपणे खचला असून नेमका या पुलाचे कामाबाबत पाणी कुठं मुरत आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये होत आहे.

नविन बांधलेला पूल एकबाजूने पूर्णपणे खचला असून या पुलाबाबत संबंधित विभागाच्या वतीने चौकशी करून ठेकेदारावर व संबंधित पुलावर नेहमी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

धामणगाव माल येथील घोडझरी नहरावरतीच्या पुलाचा कामाचा अंदाजपत्रक मध्ये सडाक चा वापर न केल्यामुळे सदर पुलाची भिंत कोसळली आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून सदर कामाला पुन्हा दुसऱ्यांदा करून सडाक टाकून काम करण्यासाठी सांगितले असून सदर कामाची सखोल चौकशी करून सदर कामाबाबत ठेकेदारावर व संबंधित अधिकारी यांच्यावर कामाबाबत कारवाही करण्याची मागणी आहे.

                                                                                                             अमोल बावनकार
                                                                                                 लोकनियुक्त सरपंच येनोली माल