श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
नागभीड (तालुका प्रती) नकली सोन्याचा हार देऊन एका महीलेची अडीच लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना नागभीड तालुक्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागभीड पासुन दोन कि.मी.अंतरावर असलेल्या नवानगर(नवखळा) येथिल रहिवासी असलेली भावना प्रविण अलमस्त या महीलेचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे.ही महीला तालुक्यात येत असलेल्या कानपा या गावाच्या आठवडी बाजारात भाजी विक्री साठी गेली.त्या महीले कडे दोन अज्ञात इसम आले.त्या महीलेला पिवाळ्या धातुचा हार दाखविला,हा हार सोन्याचा आहे.तुम्हाला अर्ध्या किंमती देतो असे सांगितले.त्यावेळी त्या महीलेने काहीच होकार दिला नसल्याची माहीती आहे.पण त्या महीलेच्या संपर्कात ते दोन अज्ञात इसम आठ दिवसा पासुन होते. १२ आँक्टोबरला त्या महीलेला उमरेडला बोलविण्यात आले.त्यानंतर तो नकली पिवळ्या धातुचा हार दाखऊन त्या बदल्यात अडीच लाख रुपये नगदी स्वरुपात घेतले.तिथेच हा संपूर्ण व्यवहार झाला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. काही दिवसा नंतर त्या हाराची परताळणी केली असता तो हार नकली असल्याचे लक्षात आले.तेव्हा चक्क आपली फसवणूक झाली आहे.त्यानंतर महिला भावना अलमस्त व तीचा नवरा यांनी नागभीड पोलीस स्टेशनला त्या दोन अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.सदर दोन अज्ञात इसमा विरुद्ध नागभीड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.