आदर्श महाविद्यालय रासेयो दिन उत्साहात

श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर 

राष्ट्रीय सेवा योजना : एक युवा चळवळ
प्रा निलेश हलामी

देसाईगंज: आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका असून देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे.
युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनातून होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. असे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा निलेश हलामी आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

याकार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजू चावके तसेच मंचावर उपस्थित रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा निलेश सलामी व प्रा अमोल बोरकर होते. पुढे राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातंर्गत राबविल्या जातात.

राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह बदल माहिती देऊनव यातूनच राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट होतात.राष्ट्रीय सेवा योजनेची ही युवा चळवळ अखंड सुरू राहावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मूलभूत योजनांचा सतत प्रचार व प्रसार या युवा चळवळीच्या माध्यमातून करीत आहे.अध्यक्षस्थानावरून डॉ राजू चावके यांनी स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कसे रुजवितात याबद्दल मार्गदर्शन केले. प्रास्ताविकेतून प्रा अमोल बोरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिवस का साजरा केला जातो त्याची पार्श्वभूमी सांगीतले. तसेच रासेयो दिनाचे औचित्य साधून रासेयो विभागांतर्गत कोविड -19 चे बुस्टर डोज वितरणाचे आयोजन करण्यात आले.

याकार्यक्रमाचे संचालन कु प्रांजली ढोरे बी.ए.भाग 3 तर आभार अखिलेश सहारे बी ए 2 यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता रासेयो लक्षगीत उठे समाज के लिए उठे उठे,जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे,स्वयं सजे वसुंधरा संवार दे,
स्वयं सजे वसुंधरा संवार दे! हे गीत सामुहिक म्हणून राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी सहकार्य केले.