जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली
दि.25: मा. मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार दिनांक 26/09/2022 पासून नवरात्री उत्सवात 18 वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी “माता सुरक्षित तर घर सुरक्षीत” या अभियांन अंतर्गत करावयाची आहे. या अनुषंगाने दिनांक 27/09/2022 रोजी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे वैद्यकीय दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. अनिल रुडे यांनी केले आहे.