बिबट्याच्या हल्यात तेरा महिण्याची बालीका जखमी.

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

आयुध निर्माणी वसाहतितील घटना.
भद्रावती.
बिबट्याच्या हल्ल्यात एक तेरा महिण्यांची बालीका जखमी झाल्याची घटना शहरातील आयुध निर्माणी वसाहतीत घडली.बिबट्याच्या हल्यात बालीका जखमी झाल्याची हि गेल्या दहा दिवसातील दुसरी घटना आहे.त्यामुळे निर्माणी वसाहतितील पालकवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. विधीशा विनोद गायकवाड असे या जखमी बालिकेचे नाव असुन या हल्यात ती किरकोळ जखमी झाली आहे.तिच्यावर आयुध निर्माणी वसाहतितील रुगणालयात प्राथमीक उपचार केल्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसांच्या अगोदर बिबट्याने केलेल्या हल्यात वसाहतितील एक बालीका किरकोळ जखमी झाली होती. या हल्यातील बिबट्या तोच असावा असा अंदाज आहे.निर्माणी वसाहतीतील सेक्टर २क्वार्टर नंबर २४बी मध्ये राहणाऱ्या विनोद गायकवाड यांची तेरा महिण्याची विधीशा ही मुलगी घराबाहेर खेळत असतांना सायंकाळच्या वेळेस बिबट्याने तिच्यावर हल्ला केला त्यात तिला किरकोळ दु:खापत झाली आहे.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही केली.