श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
पहिल्यांदाच येणार महिला राज
चिमूर तालुक्यातील चार ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा कार्यक्रम होऊ घातला असून तालुक्यातील खडसंगी मोठी ग्रामपंचायत असून याठिकाणी नऊ सदस्यांची ग्रामपंचायत कमिटी आहे. सध्या निवडणुकीमूळ जसे जसे दिवस जवळ जवळ येत आहेत त्या प्रमाणे गावगाड्यातील निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे. तर पानठेल्यावर व जिकडे तिकडे निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. खडसंगी मध्येदरवर्षी दोनच पॉनल मध्ये चुरशीची लढाई रहायची मात्र आज खडसंगी ग्रामपंचायत निवडणुकीत सद्या तीन पॉनल निर्माण झाले असून 9 सदस्य व 1 सरपंच असे एका पॉनल मधून उमेदवार उभे राहणार असून असे तीन पॉनलधून 30 नवनिर्मित उमेदवार उभे राहणार असून मतदाराला आता 3 वार्ड सदस्य व एक सरपंच असे चार लोकांना मतदान करावे लागणार आहे. त्यामुळं एका पॉनल मधून 4 लोकांना मतदान करून निवडून द्यायचे आहे असे तीन पॉनल मधून 27 नवंनिर्मित सदस्य उमेदवार असून एक सरपंच असे 30 उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
तर सरपंच ओबीसी महिला राखीव असल्यामुळं अनेक नागरिकांनी सरपंच पदाकरीता अपक्ष म्हणून सुध्दा आपले फॉर्म भरलेले आहेत यामध्ये वार्ड क्रमांक एक मधून अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण वार्ड नंबर दोन मधून अनुसुचित जमाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण तर वार्ड नंबर तीन मधून अनुसूचित जाती स्त्री, अनुसुचित जमाती, सर्वसाधारण असे आरक्षण वार्डनिहाय पडले असून यामूळ खडसंगी ग्रामपंचायत मध्ये कारभाराची धुरा ही 80 टक्के कारभारनीच्या हातात येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
@@@@@@@@@@@@@@@@
पूर्वी कायम असलेले वार्ड यावेळी बदलविण्यात आलेले आहेत त्यामुळं अनेक मतदारांना आपले नाव कोणत्या वार्डात आहे यापासून नागरीक अजूनही अनभीद्ण्य असल्याचे दिसून येत आहे.