श्री.नंदकिशोर वैरागडे, कोरची प्रतिनिधी,न्यूज जागर
दिनांक 30/09/2022 आरोग्य वार्धिनी केंद्र लेकुरबोडी अंतर्गत येणाऱ्या मुरकुटी येथे ICDS विभाग व ग्रामसभा, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, मुरकुटी यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण अभियान कार्यक्रम सांगता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
.
विविध अन्न घटकांपासून तयार केलेल्या पदार्थ आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध पालेभाज्या, फळभाज्या, विविध प्रकारचे कडधान्ये, अंकुरीत कडधान्य यांची प्रदर्शनी लावण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चिमुरकर मॅडम यांनी आयसीडीएस कार्यक्रम व योजना, गरोदरपणात घ्यावयाची काळजी, अमृत आहार योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, स्तनपान, पूरक आहार याविषयी विषयी माहिती दिली.
मार्गदर्शनपर बोलतांना आम्ही आमच्या आरोग्यासाठी चे तालुका समन्वयक नितीन पंडित यांनी मुरकुटी गावाचे कौतुक करत घनदाट जंगलात असलेल्या छोट्याशा गावात एकत्रितरित्या केलेले उत्कृष्ट नियोजन अतिशय चांगली बाब असून गावातील कुपोषण, रक्तक्षय, विविध आजाराची लक्षणे त्यावरील उपाय यावर जनजागृतीद्वारे गावाच्या आरोग्य व विकासासाठी गावातील लोकांनी अशाप्रकारे एकत्र येणे गरजेचे आहे असे सांगितले.
निशा साखरकर यांनी मोहफुलांमध्ये असणारे घटकतत्व याविषयी माहिती देऊन मोहफूला पासून तयार होणाऱ्या पदार्थांविषयी माहिती देताना आपल्या घरी मोहफूला पासून पदार्थ तयार करून आहारात घेणे, किशोरवयीन मुलंमुली यातील वाढते व्यसन बाबत मार्गदर्शन केले.
सामाजिक कार्यकर्ते ईजमसायजी काटेंगे यांनी ग्रामसभा नी आपल्या गावातील होणाऱ्या घरी प्रसूती, कुपोषण, विषयी असणारी गावकऱ्यांची मानसिकता बदलने म्हणजेच ग्रामसभा सक्षमीकरण होय असे मनोगत व्यक्त व मार्गदर्शन केले. बाल संरक्षण अधिकारी श्री.बुल्ले यांनी महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार व त्या संदर्भात रीतसर तक्रार कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. माजी उपसरपंच परसाजी पोरेटी यांनी अशा कार्यक्रमाची गरज व्यक्त करताना गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनपर बोलतांना राजाराम नैताम यांनी गावात असे जनजागृती पर कार्यक्रम होण्याची गरज व्यक्त करताना गावकऱ्यांनी अशा कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी ICDS विभागाच्या माध्यमातून स्वस्थ बालक स्पर्धा घेऊन अंगणवाडीतील तीन बालकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मोहिनकर मॅडम जि. प. शाळा शिक्षिका यांनी केले. तर आभार प्रदर्शन बुराडे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका कुमरे मॅडम तद्वतच समस्त गावकऱ्यांनी श्रमदानातून आपले योगदान दिले.
या कार्यक्रमाला गावातील महिला- पुरुष, किशोरवयीन युवक युवती, वयस्क व अन्य गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम नैताम ग्रा.प. उपसरपंच. तर प्रमुख अतिथी म्हणून सेडमाके सचिव ग्रा. प. मुरकुटी, ईजामसाय काटेंगे आ.आ.आ.स.कोरची, चेतन चौधरी, आयएसबी’चे रवींद्र चुनारकर, निशा साखरकर आरकेएसके समुपदेशक, चिमुरकर मॅडम अंगणवाडी पर्यवेक्षिका बीट मसेली कोरची तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते .