माजी जिल्हा परिषद सदस्य खोजरामजी मरस्कोल्हे यांचे महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथे व्याख्यान व सत्कार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.नसरुद्दीन भाई पंचवानी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे आज दि.2 ऑक्टोंबर 2022 रविवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूज्य लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती व माझी जिल्हा परिषद सदस्य खोजरामजी मरस्कोल्हे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व पूज्य लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर भाषणातून प्रकाश टाकला.व उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.दरम्यान त्यांचा शाल,श्रीफल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मनोहरभाऊ वनमाडी होते.विशेष सत्कारमुर्ती भाग्यवान खोब्रागडे प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष नूरअल्ली भाई पंचवानी, प्रा.राम शिरभाते आदींची उपस्थिती होती.