कृषक हायस्कूल येथे म . गांधी व शास्त्रींना आदरांजली व लेट्स चेंज फिल्मचा पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यानी घेतला

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

चामोर्शी : – कृषक हायस्कूल चामोर्शी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींना आदरांजली वाहन्यात आली. आज दि. २ आक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या जयंती उत्सवात विद्यार्थानी सहभाग घेतला व राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

तसेच स्वच्छते विषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनीस्वच्छते विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा संदेश व लेट्स चेंज फिल्म कृषक हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसोबत बसून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी या फिल्मचा विद्यार्थ्यांसोबत आनंद घेतला .

यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त कृषक हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम ,मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, शिक्षक मोरेश्वर गडकर , लोमेश्वर पिपरे ,गिरीश मुंजमकर, जासुंदा जनबंधू , प्रणिता भांडेकर ,प्रकाश मठ्ठे , लोमेश बुरांडे , दिलीप लटारे,अरुण दूधबावरे ,मारोती दिकोंडवार व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक संजय कुनघाडकर तर आभार वर्षा लोहकरे यांनी पार पाडले .