गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथे ग्रामपंचायतच्या वतीने आज 2 आक्टोबर ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्या अंतर्गत स्वच्छता हिच सेवा च आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. गडचिरोली चे उपमुख्य कार्यपालन अधिकारी फुरेंद्र कुतिरकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी प. स. गडचिरोली चे गट विकास अधिकारी साळवे सर, सरपंच शशिकांत कोवे, उपसरपंच शोभा जेंगठे आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना उपमुख्य कार्यपालन अधिकारी कुतिरकर सर यांनी स्वच्छता तसेच सांडपाण्याच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करुन राष्ट्रपिता महात्मा गांधीनी सांगितलेल्या गावाकडे चला या संकल्पनेला पुर्ण करायचे असेल तर गावात स्वच्छते सोबतच गावात घाण राहणार नाही याची काळजी ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.
यावेळी ग्रामपंचायत प्रशासन द्वारा पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुर्वा लोककला पथनाट्य पोभुर्णा द्वारा सद्या राज्यात व देशात थैमान घातलेल्या विविध रोगां बरोबर विविध योजनांची माहिती सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता मुडझा ग्रा. प. चे ग्रामसेवक डि. ए. वायबसे, ग्रा. प. चपराशी संजय चौधरी, पुरुषोत्तम मेश्राम, संगणक परिचालक सारिका मोगरे, ग्रा. प. सदस्य राकेश लोणारकर, विवेक बारसिंगे, रामदास सुरपाम, पोलिस पाटिल तुलाराम राऊत, मुख्याध्यापक नारनवरे सर, गंडाटे सर, जांभुळकर मँडम, ऊईके मँडम, कुंभरे मँडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमरगुंडावार व गावकरी, शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.