गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
महाग्रामसभेने केली जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार.
एटापल्ली : तालुक्याच्या दुर्गम भागातील वेनहारा परिसरात येणारे सर्व ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, आरोग्य सेवक, सेविका नियमित मुख्यालय राहत नसल्याची तक्रार एटापल्ली तालुक्यातील वेनहारा महाग्रामसभेने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की गेल्या अनेक महिन्यापासून वेनहारा परिसरात येणाऱ्या संपूर्ण ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक सतत गैहजर राहतात ते गडचिरोली वरून ये जा करतात त्यामुळे स्थानिक लोकांना दाखले व शैक्षणिक कागदपत्रे वेळीच मिळत नाही. परिणामी तहसील मधील प्रमाणपत्र प्राप्तीच्या प्रक्रियेत अडचणी येतात. शिक्षक सुद्धा तालुका मुख्यालय राहुल सेवा देतात. त्यामुळे त्यांना शाळेत येण्यासाठी विलंब होतो. अनेकदा शाळेला सुट्टी मारतात अशा प्रकारामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे दर्जा कसा वाढविता येईल यासाठी या भागातील कर्मचाऱ्यांना तालुका मुख्यालयीन राहून कर्तव्य बजावण्यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी महा ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.