विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात २९५ रुग्णाची शस्त्रक्रियासाठी निवड

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

रत्नापुर येथील श्री. गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळातील शिबिर संपन्न

चंद्रपूर जिल्ह्यात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तथा रक्तदान शिबिरांची एक लोकचळवळ उभी करणारे व्यक्तिमत्व म्हणून माजी जि.प.सदस्य रमाकांत लोधे आणि श्री:गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ रत्नापुर येथील मंडळ होय.मागील सातत्याने १८ वर्षापासून अखंडितपणे मोतीबिंदू शिबिरांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे महान कार्य रत्नापुर येथील दुर्गा मंडळनी केले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे१८वर्षा पासुन श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ कार्यरत आहे. सदर मंडळाचे वतीने नवरात्र उत्सवात दुर्गा मातेची स्थापना करून दरवर्षाला देखावाचे प्रतीकृती तयार करुण दर्शनासाठी ठेवतात सोबतच मंडळाचे वतीने सामाजिक उपयोगी येणारे कार्यक्रम उपक्रम मंडळचे वतीने संपूर्ण नव दिवस राबविले जातात.सिंदेवाही तालुक्यातील मौजा रत्नापुर येथे श्री:गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने दुर्गाउत्सव २०२२ निमित्य, सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर, दि. २९सितंबर २०२२ ला भव्य विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.

 

सदर शिबिरात ६५०रूग्णांची नोंदणी करून तपासणी करण्यात आली आणि रुग्णांची शस्त्रक्रिये करीता२९५ रुग्णाची निवड करण्यात आली. शिबिराच्या उदघाटन करुण कार्यक्रमाला सुरवात केली. उदघाटन प्रसंगी या शिबिराच्या कार्यकर्माचे उदघाटक डॉ. नामदेव किरसान महासचिव,महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी , या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव लोधे जेष्ठ नागरिक रत्नापुर, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने डॉ:जाधव नेत्र सहायक सिंदेवाही,रमाकांत लोधे माजी जि. प. सदस्य चंद्रपुर ,संजय गहाने उपाध्यक्ष रत्नापुर,वामन जीवतोड़े सचिव रत्नापुर, संतोष हेड़ाऊ,भागेश टेभूर्ण आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र रत्नापुर , उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव चनफने तर प्रस्ताविक रमाकांत लोधे यांनी केले.आणि आभार प्रदर्शन संजय गहाने यांनी केले. शिबिराच्या उभारणी करिता लायन्स क्लब चंद्रपुर अध्यक्ष विवेक भास्करवार, सचीव सुनील कुलकर्णी , प्रकल्प अधिकारी लायन्स क्लब चंद्रपुर दिनेश बजाज आणि सेवाग्राम नेत्र रुग्णांलयाचे नेत्रतज्ञ डॉ.अजय शुक्ला, नेत्र सहायक डॉ.सचिन ताकसांडे ,डॉ. अजहर शेख आणि सेवाग्राम येथील त्यांची चमू यांनी सहकार्य केले सोबतच शिबिराच्या यशस्वीतेकरीता मंगेश मेश्राम ग्राम पंचायत सदस्य रत्नापुर, वासुदेव दडमल ग्राम. पं.सदस्य रत्नापुर, ईमरान पठान ग्राम. पं. सदस्य रत्नापुर,कपिल मेश्राम सामाजिक कार्यकर्ता रत्नापुर, रंजित मेश्राम,राहुल गहाने,लोकेश गभने,अंकुश गहाने,अनिकेत गहाने,टीकाराम कुंभरे,लीलाधर वलके, आदित्य गहाने, दिलीप तोंडफोड़े,बंडू गभने, गुरुदास पर्वते, बंडू बंसोड़,आणि श्री. गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ रत्नापुर येथील समस्त सभासद यांनी मेहनत घेतली.