श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव जवळील एच.पी. पेट्रोल पंप जवळ सिंदेवाही- तळोधी मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी वेडसर व रस्त्याने भटकणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
आज पहाटेच पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असल्याची घटनास्थळी निदर्शनास आले. सदर मृतक हा अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटाचा असल्याचे व त्याच्या कपड्यावरून तो महाराष्ट्रियन नसल्याचे घटनास्थळी त्याला पाहता निदर्शनास येत होते. सावळा रंग, मजबूत बांदा, दोन ते तीन इंच वाढलेले कुरळे केस , बारीक मिशी व फक्त हनुवटीवर दाढी असलेला युवक अंदाजे वय 35 वर्षे वयाचा असलेला युवक अपघातामुळे मृत अवस्थेत आढळून आला.
घटनास्थळी पाहता कोणत्यातरी अज्ञात मोठ्या वाहनाने त्याचा डोका चिरडल्यामुळे कवटी फुटून त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेचा मोक्का पंचनामा करून तळोधी(बा.) पोलिसांच्या द्वारे शव विच्छेदनाकरिता नागभिड येथे तालुका ग्रामीण रुग्णालयामध्ये करिता पाठवण्यात आला.
सावळा रंग , मजबूत बांदा, दोन ते तीन इंच वाढलेले कुरळे केस , बारीक मिशी व फक्त हनुवटीवर दाढी असलेला, साडे पाच फूट उंचीचा युवक, अंदाजे वय 35 वर्षे वयाचा असलेला, अंगावर पांढरी रंगाची मळलेली पुर्ण हाताची जिन्स शर्ट, व शेवाळी बर्मुडा, घालून असलेला, कोणी ओळखत असल्यास तळोधी (बा.) पोलिसासी संपर्क साधावा. असे पोलिसांनी आवाहन केले आहे .
सदर घटनेची चौकशी तळोधी बा.पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक डी. आर. शेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल भांडारकर, पोलीस कॉन्स्टेबल मंगम व तळोधी बा. पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.