शाळा बंदच्या निर्णया विरोधात मुंबई मध्ये छात्रभारतीचे पोस्टर आंदोलन

विशेष प्रतिनिधी न्युज जागर

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या 100 पेक्षा जास्त गाड्यांना पोस्टर लावून छात्रभारतीने शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला.

नुकताच राज्य सरकारने राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करण्याचा निर्णय घेतला असतांना या निर्णया विरोधात आज छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या BKC च्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी व खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत 0 ते 20 पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. यावेळी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी आलेल्या बसेसना

“एसटीला भरले १० कोटी शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती”

“शिंदे साहेबांना सांगाल का ? शाळाबंदी करु नका ”

“जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा”

“बसला भरले १० कोटी , शिक्षण नेले मागे आश्वासन खोटी”

अशा आशयाचे स्टीकर लावून छात्रभारती विद्यार्थी संघटनेने राज्याध्यक्ष रोहित ढाले यांच्या नेतृत्वाखाली छात्रभारतीचे सचिन बंनसोडे, विकास कोटेकर, निकेत वाळके, निलेश शेंडे सह असंख्य कार्यकर्त्यांनी शाळाबंदीच्या निर्णयाचा धिक्कार केला.