श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
पोंभूर्णा/१९ ऑक्टोबर.
तालुक्यातील चेक फुटाणा येथील जंगल परिसरात चराईसाठी गेलेल्या बैलावर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घटना घडली. विनोद बाबुराव तेलंगे रा.चेक फुटाणा यांच्या मालकीचे सदर जखमी बैल आहे.
१७ आक्टोंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास जंगलात बैल चराई करीत होता. झुडूपाच्या मागे दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.
जखमी बैलावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र कोणतीही सुधारणा होत नसल्याने बैलाचा मालक चिंतेत असून त्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
घटनेमुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची व शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.