श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
तळोधी बा: आपल्या घरच्या स्लॅब वर कठाण माल सुकवित असताना मीराबाई शंकर पराते वय 69 वर्ष माकडाला हाकलित असताना तिच्यावर माकडाने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली.जखमी अवस्थेतच तिला उपचाराकरीता ब्रम्हपुरी येथील दवाखान्यात नेले असता डांक्टरानी मृत घोषीत केले.
लक्ष्मी पुजनाच्या दिवशी माकडाने महिलेवर हल्ला केल्याने नागरिक धास्तावले आहे.तळोधी बा.येथे मोठया प्रमाणावर माकडाचा हैदोस आहे. अनेकांच्या घरांचे व सामानाचे नुकसान होत आहे. तरी वनविभागाच्या वतीने तळोधी बा.येथील माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकाच्या वतीने करण्यांत आली आहे.