इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

श्री.श्याम यादव , कोरची तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

 

.
कोरची मुख्यालया पासुन 4 कि.मी.अंतरावर भिमपूर येथील देवदास साहाजाराम मडावी वय (38) हा रात्रोला जेवण करून पती-पत्नी आपापल्या बेड वरती झोपी गेले होते . गाढ झोपेत दुसऱ्या रूम मध्ये जाऊन स्वतःच्या टॉवेलने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 27 ऑक्टोंबर च्या रात्रो घडली आहे.

सकाळी घरच्यांना दुसऱ्या रूम मध्ये  स्वतःच्या टॉवेल ने मयालीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले ,  बघितले त्यानंतर पत्नीने आवाज देऊन आजूबाजू च्या लोकांना बोलाविले असता  शेजारील लोकांनी  घराकडे  धाव घेतली .

कोरची पोलीस स्टेशनला पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर  कोरची ग्रामीण रूग्णालय प्रेत आणून पोस्टमार्टम करण्यात आले .आणि त्यांचे मृत शरीर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. भीमपूर मशानभूमी येथे मृतकावर अत्यसंस्कार करण्यात आले. तो मनमिळाव प्रेमळ स्वभावाचा होता. त्याच्या पचाताप पत्नी 1,मुलगा 1,मुलगी 1 असा आप्त परिवार आहे .त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पण आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तपास पोलीस निरीक्षक श्री. अमोल फरतळे करीत आहेत.