भ्रष्ठ अधिकाऱ्याच्या पाठीशी वरिष्ठ अधीकारी ?– भाग २

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर

जिवती चे प्रभारी तहसीलदार चिडे यांची करतबगीरी ची प्रिया झांबरे यांनी केली शासनाकडे तक्रार

बनावटी खोटे बिल तयार करुन चिडे यांनी स्वातंत्राचा अमृत महोत्सव करीता शासनाकडुन आलेला निधी स्वतःच्या खिशात जमा केल्याचे सबळ पुरावे देऊन ही जिल्हाधिकारी यांची कार्यवाहीत धीमी गतिची प्रक्रिया

चिडे सारखे भ्रष्ट अधिकारी शासकीय सेवेत कार्यरत म्हणजेच शासनाच्या पाठीत सुरा आणी जनतेच्या पैशाची उधळपट्टी

१५ आँगस्ट २०२२ ला ७५ वां स्वातंत्राचा अमृत महोत्सव खुप धूमधाम नी साजरा करण्यात यावा याकरीता प्रत्येक जिल्हाच्या प्रत्येक तहसील कार्यालयात शासनाकडुन ४:५० लाख रुपए रक्कम निधीच्या स्वरुपात आली. परंतु चिडे यांनी आपली कर्तबगीरी दाखविली आणी खोटे व बनावटी बिल तयार करुन शासनानी पाठविलेल्या रक्कमेला रफादफा केल्याचे झांबरे यांनी सांगीतले. चिडे यांनी खुप हुशारीने शिवकुमार तांबुळे जिवती या व्यक्तीच्या जय भवानी ट्रान्सपोर्ट तयार केला. शासनाकडुन आलेली मोठी रक्कम पाहुन चिडे यांची नियत फिरलेली दिसून येत आहे .

 

शासनाकडुन आलेला निधी आजपर्यत चिडे यांनी किती गायब केला असावा. यांची माहिती लवकरच उघड करण्यात येईल असा इशारा झांबरे यांनी दिला. हा सगळा भ्रष्टाचार वेगानी समोर येऊन सुद्धा कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी चंद्रपुर आणी विभागीय आयुक्त हे कुणाची वाट पाहतात असा प्रश्न आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आणी युवा स्वाभिमान पक्षाच्या पधाधिकाऱ्यांच्या मनात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी चिडे यांचे आपसी मधुर गोडीगुलाबीचे संबध असल्यामुळे अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशीहि चर्चा रंगत असल्याचे दिसून येते

 

कर्तव्यात कसुर करणारा चिडे सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करुन कायमस्वरुपी शासकीय सेवेतुन काढुन टाकण्याचे शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावे अशी मागणी प्रिया झांबरे यांनी केली. जिल्हाधिकारी यांचे कडून कारवाई ची अपेक्षा

 

शिवकुमार तांबुळे, बनावटी जय भवानी ट्रान्सपोर्ट चा मालक, याला माहिती नसतांना तहसीलदार चिडे यांनी खोटे व बनावटी बिल तयार केले. शासनासमोर याची तक्रार व खुलासा , आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कम्यूनिटी इंडिया च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष व आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रियाताई झांबरे आणी त्यांच्या टीम नी केलेला आहे.