चामोर्शी तालुका प्रतिनिधी ,न्यूज जागर
जगना उपक्षेत्रातील मुरमुरी जंगल परिसरातील घटना.
कुनघाडा रै
जिल्ह्यात वाघाने ठार केल्याच्या अनेक घटना घडत असून, कुनघाडा रै वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र जोगना अंतर्गत येणाऱ्या मुरमुरी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ४ मध्ये वाघाने हल्ला करून वृद्ध इसमाच्या नरडीचा घोट घेतला आहे. तर गायीसह ठार केले आहे.
दशरथ उंदरु कुनघाडकर वय ६० वर्ष रा. भाडभिडी मोकासा असे मृत वृद्धाचे नाव असून संदीप डोमाजी गव्हारे रा. भाडभिडी मोकासा यांच्या मालकीची मृत गाय आहे. दोन्ही घटना ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडल्या
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार मृत वृद्ध इसम दशरथ उंदरु कुनघाडकर हे नेहमीप्रमाणे ८ नोव्हेंबर रोजी ११ वाजता जेवण आटपून घरची स्वमालकीची गुरे चरावयास नेण्यासाठी जंगलात गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने प्रथम दशरथ कुनघाडकर यांच्यावर हल्ला करून ठार केले. नंतर गायीवर वार करून तिला ठार केले. सायंकाळी ५ वाजता फक्त गुरे घरी परत आले. मात्र रात्र होऊन सुद्धा दशरथ कुनघाडकर हे घरी परत आले नसल्यामुळे गावातील ग्रा. प. सदस्य विकेश नैताम, भाऊराव नैताम, सुधाकर कुनघाडकर, शामराव कुनघाडकर व इतरांनी मिळून रात्री ११ वाजता जंगलात जाऊन शोध घेतला मात्र शोध लागला नाही.
९ नोव्हेंबर रोजी सकाळी शोधाशोध केली असता प्रथम मृत गायीचे प्रेत आढळले व नंतर त्यांच्या शेतशिवारात दशरथ कुनघाडकर यांचे अर्धवट शरीर असलेले अस्थावयस्थ प्रेत आढळले प्रेताचा चेहरा व कपडे यावरून ओळख पटली दशरथ कुनघाडकर यांच्या शरीराचे दोन तुकडे करून धड व पाय वेगळे झाले होते