वैनगंगा नदीपात्रात तोल गेल्याने युवकाचा बुडून मृत्यू

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

दिनांक:-१६/११/२०२२ ला देवानंद वामन कोटनाक वय वर्षे २२ आवळगाव येथील रहिवाशी हा वैनगंगा नदी तीरावर असलेल्या चीचगाव (डोर्ली) व आवळगाव त्रिवेनी संगम नदी तिराच्या मध्यभागी शेतामध्ये सहभोजन करण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. मित्राच्याच शेतामध्ये देवानंद व काही मित्र भोजन बनवायला सुरूवात केली. भोजन बनवून झाल्याने देवानंद व सर्व मित्रांनी सह भोजनाचा आस्वाद घेतला. देवानंदनी सहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर हात धुवायला अगदी लागून असलेल्या वैनगंगा नदी तीरावर गेला असता नदीपात्रात तोल गेल्याने नदीपात्रात दिसेनासा झाला .

बराच वेळ होऊनही  देवानंद हात धुवून अजूनही का आला नाही..? म्हणुन सर्व मित्रांनी नदीकडे धाव घेतली. सर्वांनी देवानंद ला आवाज मारला माञ देवानंदचा आवाज येत नव्हता काहीच शोध लागत नव्हता . लगेच गावात व नदी तीरावर असलेल्या लोकांनी काही मित्रांनी धाव घेतली व घटनेची आपबिती सांगितले. लगेच काही लोकांनी घटना स्थळाकडे धाव घेतली व देवानंदचा इतरत्र शोध घेतला मात्र देवानंद चा थांगपत्ता लागेना. ही माहिती मेंडकी पोलिस चौकीला देण्यात आली. मेंडकी पोलिस चौकीतील काही अधिकारी व कर्मचारी यानी घटना स्थळाकडे धाव घेतली व पाणबुड्याच्या साह्याने शोध घेतला मात्र देवानंदचा शोध लागला नाही. १६/११/२०२२ चा दिवस असाच निघुन गेला. परत दिनांकः १७/११/२०२२ ला सकाळ पासुन शोधमोहीम घेण्यासाठी बोटी बोलाविण्यात आली. सलग दोन दिवसांच्या शोधमोहिमे नंतर पोलिसांना दिनांक १८/११/२०२ ला ३:३० वाजता च्या दरम्यान देवानंदचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळाला.

लगेच मृतदेह पाण्याबाहेर काढूण उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात येणार असल्याचे प्राप्त माहिती आहे. देवांनंदच्या पच्छात्य कुटुंबात तिन जण असुन घरचा लाडका एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देवानंद हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा मुलगा होता त्याच्या जाण्याने आवळगाव परिसर शोकसागरात बुडालेला आहे.