श्री.श्याम यादव कोरची प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२५/११/२०२२
कोरची
18 प्रवासी जखमी त्यात अडीच वर्षांचा बालक व दोन गर्भवती महिलांचा समावेश असून 4 प्रवासी गंभीर जखमी
कोरची:-प्रतीनीधी मुख्यालयापासून 4 किमी अंतरावर असलेल्या बेळगाव जवळ कोटगुल वरून येणारी भरधाव खाजगी बसचे (MH40N1014)नियंञण सुटल्याने अपघात झाले. ,असून अपघात झालेली बस हि रोडलगतच्या खड्यात जाऊन पलटीखाल्ली असून या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करीत असल्यानचे माहिती प्राप्त झाली असून यापैकी 18 प्रवासी जखमी झाले असून 4प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यानां पुढील उपचारा करिता गडचिरोली येथिल जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सदर अपघाताची माहिती वडसा वरून येणारे व्यावसायिक जिशान मेमोन हे खाजगी काम करिता कोरची येथे येत असताना अपघात झाल्याचे दिसले असता, यांनी अपघाताची माहिती काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांना दिली. तसेच वेळ वाया न घालवता मनोज अग्रवाल यांनी कोरची तील समाज कार्यकर्ते वसीम शेख, आशिष अग्रवाल, सुरज हेमके, जितेंद्र सहारे, अभिजीत निंबेकर यांना दिली. या सर्वांनी वेळ वाया न घालवता घटनास्थळी पोहचवून सर्व प्रवाशांना खाजगी वाहन तथा 108 द्वारा कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. व त्यांच्यावर योग्य ते उपचार डॉ राहुल राऊत व त्यांच्या चमू तर्फे करण्यात आले असून रुग्णाच्या नातेवाईकांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले असून गंभीर जखमी रुग्णांना गडचिरोली येथे हलविण्यात आले.
सदर अपघातात रामचंद्र टेंभुळकर (वय 75वर्ष ) बेडगाव , जयाबाई धुर्वे कुरखेडा(वय 70वर्ष ),संताबाई मडावी कोरची (वय 35वर्ष ),श्यामलाल पुरमे सोनपूर(वय 65वर्ष ),कुमारी गावडे नांडळी (वय 30वर्ष ),ललिता पडोटी सोनपूर(वय 40वर्ष ), अंबरीबाई टेंभुळकर (वय 36वर्ष ), निकिता टेंभुळकर बोरी (वय 21वर्ष ), दीपिका शिकारी कोटगुल (वय 25वर्ष ),, रामलाल शिकारी कोटगुल (वय 40वर्ष ), अरमान शिकारी कोटगुल (वय अडीच वर्ष ),रचना शिकारी कोटगुल (वय 7वर्ष ),नंदिनी शिकारी कोटगुल (वय 3वर्ष ), आनंदराव मरापे कोरची(वय 56वर्ष ),हिलम मडावी मोहगाव (वय 21वर्ष ), मनोज मडावी मोह्गाव (वय 25वर्ष ), असे एकूण 18 प्रवासी गंभीर जखमी झाली असून यापैकी दीपिका शिकारी, आनंद मरापे ,अमरी बाई टेंभुर्ण, निकिता टेंभुर्ण, या गंभीर जखमी असून यांना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातात दोन गर्भवती महिला व अडीच वर्षाच्या बालकाच्या समावेश आहे.
अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून आलेले मनोज अग्रवाल, वसीम शेख, आशिष अग्रवाल, सुरज हेमके ,जितू सहारे, अभिजीत निंबेकरया सर्वांचे रुग्णालयांच्या नातेवाईकाने आभार मानले असून, ते आमच्यासाठी देवदूत ठरले अशी प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली.
अपघाताची पुढील तपास बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करीत असून बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ,अशी माहिती प्राप्त झालेली आहे.